लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कजर्मुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास बुलडाणा तालुक्यातील साखळी बु व जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथून प्रारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, कर्जमुक्तीस पात्र असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील या दोन्ही गावातील ५५६ शेतकऱ्यांची यादी कर्जमुक्ती संदर्भातील पोर्टलवर उपलब्ध झाली आहे.दरम्यान, आधार प्रमाणीकरण योजनेचा प्रारंभ सुनगाव येथे एसडीओ वैशाली देवकर तर साखळी येथे जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार ५६ पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे तर प्रायोगिक तत्त्वावर सुनगाव व साखळी येथील अनुक्रमे ३६४ व १९२ पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे. ही यादी संबंधित बँक व ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दोन्ही गावातील एकूण 404 शेतकºयांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुरळीतपणे सुरु होते. शेतकºयांना कर्जमुक्ती देण्याच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात आली आहे.योजनेनुसार एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एका पेक्षा जास्त कर्जकात्यात अल्पमुदत पीक कर्ज व अल्प मुदत पीक कर्जाच्या पूनर्गठीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम दोन लाखांपेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास दोन लाख मर्यादेपर्यंत कजर्मुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. यात कर्जमुक्ती देताना श्ेतकºयांने धारण केलेल्या जमीनीचे क्षेत्र विचारात घेतले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळेअल्पभूधारक नाहीत, अशा शेतकºयांनाही याचा लाभ मिळेल.
बुलडाणा: दोन गावातील पात्र ५५६ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 15:12 IST