लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: थेट सरपंच पदाच्या निवडीमुळे यावर्षी बुलडाणा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत रंगत आली हो ती. सोमवारी निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच ग्रामपंचायतीत सर्वपक्षीय जल्लोष दिसून आला; मात्र काँग्रेस, भाजपा, शिवसेना आदी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.बुलडाणा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. त्यात सावळा, येळगाव, सव, हतेडी खु., गिरडा, चिखला, दत्तपूर, ढालसावंगी, मौंढाळा, रूईखेड मायंबा, ईरला व उमाळा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, आज मतमोजणी झाल्यानंतर सर्वच ग्रामपंचायतीत सरपंच पद निवडीचा जल्लोष दिसून आला. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी बुलडाणा तहसील कार्यालय परिसरात सकाळपासून विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. तर दुपारी १ वाजेपर्यंत १२ ग्रामपंचयतींचे निकाल घोषित करण्यात आले. त्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या सावळा-सुंदरखेड गट ग्राम पंचायतींच्या सरपंचपदी अपर्णा राजेश चव्हाण यांनी १,६५९ मते घेऊन विजय मिळविला. त्यांच्या विरुद्ध सोनाली संतोष राजपूत यांनी १,४२८ मते घेऊन उल्लेखनीय लढत दिली. तर जिजाबाई साहेबराव रिंढे यांना १,२६६ मते मिळाली. येळगाव ग्रामपंचाय तीच्या सरपंचपदी लिलाबाई दशरथ वाघ यांनी ८९३ मते घेऊन विजय मिळविला. सव सरपंचपदी छाया संजय गाढे यांनी ८७0 मते घेऊन विजय मिळविला. हतेडी बु. सरपंचपदी ४३४ मते घेऊन अनिता नंदकिशोर गायकवाड विजयी झाल्या. गिरडा सर पंचपदी ७२३ मते घेऊन भरत भीमराव भिसे विजयी झाले. चिखला ग्रामपंचायत सरपंचपदी ३९५ मते घेऊन मीरा मुकेश वाघ यांनी विजय मिळविला. दत्तपूर सरपंचपदी संगीता गजानन जाधव यांनी ३३९ मते घेऊन विजयी झाल्या. ढालसावंगी सर पंचपदी शेख अजीज लुकमान यांनी ९0९ मते घेऊन विजय मिळविला. मौंढाळा सरपंचपदी राजेंद्र नामदेव जाधव यांनी ५७७ मते घेऊन विजय मिळविला. रुईखेड मायंबा सरपंचपदी १,१७८ मते घेऊन विष्णू ठकुबा उगले यांनी विजय मिळविला. ईरला सरपंचपदी ३२२ मते घेऊन सविता भास्कर सरोदे यांनी विजय मिळविला.
सर्वच राजकीय पक्षांनी ठोकला दावाबुलडाणा तालुक्यातील निकाल जाहीर झालेल्या १२ ग्रामपंचाय तींवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली सत्ता आल्याचा दावा केला आहे. काँग्रेस पक्षाने १२ ग्रामपंचायतींपैकी ९ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकल्याचा दावा केला आहे. तर भाजपाने १२ पैकी ६ जागेवर वर्चस्व मिळविल्याचा दावा केला आहे. तर शिवसेनेने बुलडाणा व मोताळा तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीं पैकी ७ ग्रामपंचायतींवर भगवा फडकल्याचा दावा केला आहे. तर गिरडा, गोंधनखेड, इजलापूर व मेरखेड या गट ग्रामपंचाय तीवर संपूर्ण पॅनलसह सरपंचपदी भारत भिसे निवडणूक आले असून, ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे.
उमाळा सरपंचपदी अनिता सपकाळ अविरोधबुलडाणा तालुक्यातील उमाळा सरपंचपदी अनिता गणेश स पकाळ व इतर सात सदस्य अविरोध निवडणून आल्याची घोषणा निवडणूक अधिकार्यांनी यावेळी केली. उमाळा गाव आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचे गाव असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवड अविरोध करण्यात आली असून, गावाला विकास कामासाठी १0 लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.