पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मलकापूर नऊ, माकनेर एक, दाताळा एक, चिखली ११, शेलूद एक, पळसकेड दौलत दोन, देऊळगावराजा १८, अंढेरा चार, वाकी दोन, सावंगी टेकाळे चार, सातेफळ एक, देऊळगाव मही एक, सिनगाव जहागीर चार, आळंद चार, बुलडाणा ४१, सागवन दोन, सुंदरखेड एक, शिरपूर १, अंभोडा सहा, माळविहीर एक, धाड एक, मोताळा एक, गुळबेली एक, जळगाव जामोद सात, झाडेगाव सात, धानोरा एक, आसलगाव दोन, कुरणगड १२, खामगाव २५, घाटपुरी चार, निरोड चार, उमरा अटाळी दोन, विहीगाव दोन, रोहणा एक, पिंपळगाव राजा एक, हिवरखेड २१, शिरला नेमाने एक, शेगाव ३०, भोनगाव एक, अळसना एक, जानोरी नऊ, टाकली विरो तीन, तरोडा कसबा एक, सिंदखेड राजा तीन, साखरखेर्डा एक, किनगाव राजा एक, हिरडव दोन, सुलतानपूर दोन, जानेफळ ११, दुधा एक, मोळा एक, निबंका एक, कल्याण एक, हिवरा साबळे चार, गजरखेड सहा, डोणगाव एक, पेनसावंगी दोन, देऊळगाव माळी पाच, घाटबोरी एक, कळमेश्वर एक, मेहकर १४, नांदुरा २०, वाडी दोन, तरवाडी एक, तांदुळवाडी दोन आणि जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील एक, वाशिम येथील एका बाधिताचा यात समावेश आहे. दरम्यान, बुलडाणा शहरातील रामनगरमधील ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे शनिवारी मृत्यू झाला. दोन दिवसानंतर एखाद्या कोरोना बाधिताचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे रविवारी २८४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ लाख ३६ हजार ८३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच १५,७७६ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
--८५६९ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा--
तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ८५८९ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १८ हजार ६६८ झाली आहे. त्यापैकी २,६९९ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.