मध्यप्रदेशात विक्री करण्यात आलेल्या बुलडाण्याच्या महिलेची अखेर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 11:20 AM2021-02-13T11:20:02+5:302021-02-13T11:20:09+5:30
Crime News बुलडाण्यातील चार आरोपींसह मध्यप्रदेशातून पीडित महिलेसह तिचा कथीत पती यांना बुलडाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: देवदर्शनाच्या बहाण्याने बुलडाणा शहरातील विष्णुवाडी भागात राहणाऱ्या एका महिलेची मध्यप्रदेशात विक्री करणाऱ्या बुलडाण्यातील चार आरोपींसह मध्यप्रदेशातून पीडित महिलेसह तिचा कथीत पती यांना बुलडाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सध्या या प्रकरणात पोलिस पीडित महिलेचा जबाब नोंदवीत आहेत.दिवाळीपासून ही महिला मध्यप्रदेशातील सोयत पोलिस ठाण्यातंर्गत असलेल्या कंवराखेडी येथे आरोपी पप्पु मेहेर (२६) याच्याकडे होती. पीडित महिले ही तिच्या पतीपासून विभग्त राहते. दिवळी दरम्यान या पीडित महिलेला व तिच्या मुलाला बुलडाण्यातील तीन महिला व एका व्यक्तीने देवदर्शनासाठी नांदेड जिल्ह्यात जावू म्हणून नेले. मात्र तिला नंतर परभणी जिल्हयातील एका खेड्यात नेण्यात आले .तेथे तिचे कथीतस्तरावर पप्पू मेहेर याच्याशी जबरीने विवाह लावून देण्यात आला होता. तेव्हापासून ही महिला मध्यप्रेदशातील पप्पू मेहेर याच्याकडे होती. या संदर्भात पीडित महिलेचा मुलगा हा स्थानिक केदार राजुरिया यांच्याकडे काम करत होता. दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी पीडित महिलेचा केदार राजुरिया यांना फोन आला त्यानंतर हा संपुर्ण प्रकार समोर आला. प्रकरणी राजुरिया यांनी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पीडित महिलेसह बुलडाण्यातील चार व मध्यप्रदेशातून पीडित महिलेचा कथितपती राजू मेहेर यास ताब्यात घेतले आहे.