लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: बीड येथील पंचायत समितीचे कंत्राटी कर्मचारी सुहास जायभाये यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ येथील जिल्हा परिषद शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज १ जानेवारी रोजी काळय़ा फिती लावून कामकाज केले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, बीड येथील पंचायत समितीमध्ये भारत मिशन अंतर्गत समूह समन्वयक म्हणून सुहास तुकाराम जायभाये हे कार्यरत आहेत. दरम्यान, आरोपी सैय्यद नईम मुकरम याने लाभार्थी असल्याचे सांगून शौचालयाच्या पाच प्रकरणात प्रोत्साहन निधीची मागणी केली; परंतु जायभाये यांनी सदर प्रस्ताव हे योग्य नसल्याने लाभ देता येणार नाही, असे त्यास सांगितले. त्यावेळी सैय्यदने कार्यालयातच सुहास जायभाये यांना जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जायभाये यांनी पोलिसात तक्रार दाखल केली; परंतु अद्यापही आरोपीविरुद्ध ठोस कारवाई करण्यात आली नाही. यापूर्वीदेखील कर्मचार्यांना अशा घटनांना सामोरे जावे लागले आहे. असे असताना कंत्राटी कर्मचारी असे समजून वरिष्ठ अधिकारी कर्मचार्यांना सरंक्षण देत नाहीत. उलटपक्षी कर्मचार्यांना धाकदपट करून त्यांना चूप केल्या जात आहे. त्यामुळे कर्मचार्यांना संरक्षण देऊन मारहाण करणार्या आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येथील जिल्हा परिषद शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून कामकाज केले आहे. या आंदोलनात संघटनेचे राज्याध्यक्ष विलास निकम, जिल्हाध्यक्ष नवृत्ती शेडगे, वैभव डांगे, संतोष पाखरे, योगेश सुरडकर यांच्यासह असंख्य कर्मचारी सहभागी झाले होते.
बुलडाणा : कंत्राटी कर्मचार्यांचे काळ्या फिती लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:21 AM
बुलडाणा: बीड येथील पंचायत समितीचे कंत्राटी कर्मचारी सुहास जायभाये यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ येथील जिल्हा परिषद शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज १ जानेवारी रोजी काळय़ा फिती लावून कामकाज केले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देबीड येथील कंत्राटी कर्मचार्यास मारहाणीचा निषेध