शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

१४ लाखांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 2:07 AM

बुलडाणा तालुक्यातील वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत कर्मचा-यांच्या पगार घोटाळ्यातील आरोपानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीअंती १४ लाख रुपये घोटाळा केल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देवरवंड प्राथमिक आरोग्य केंद्रातील पगार घोटाळाआरोपी शंकर राजूरकर यास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : तालुक्यातील वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत कर्मचा-यांच्या पगार घोटाळ्यातील आरोपानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीअंती १४ लाख रुपये घोटाळा केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर राजूरकर यास २६ जुलै रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.याप्रकरणी वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.गणेश प्रल्हाद राठोड यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जून २०१५ पासून आॅक्टोबर २०१६ पर्यंत कर्मचाºयांचे पगार पत्रकांची तपासणी केली असता, कनिष्ठ सहायक म्हणून गजानन शंकर राजूरकर तसेच आरोग्य सेवक म्हणून पुरूषोत्तम सरदारसिंह साळोक यांनी संगनमत करून काही कर्मचाºयांच्या पगारातील रक्कम आपल्या बँक खात्यात वळती केली. आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाºयांच्या पगारातून ५ लाख ८१ हजार ३४ रुपये तसेच इतर देयकामधून ८ लाख ३ हजार २९४ रुपये असे एकूण १३ लाख ८४ हजार ३२८ रुपयांचा घोटाळा करून व्हावचरवर वैद्यकीय अधिकाºयांच्या बनावट सह्या करून सदर रक्कम दोघांनी वाटून आपल्या खात्यात अवैधरीत्या वळती केल्याचे दिसून आले. कनिष्ठ सहायक राजूरकरने आपल्या बँक खात्यात ६ लाख २ हजार ४७८ रुपये तसेच आरोग्यसेवक पुरुषोत्तम साळोक याने आपल्या बँक खात्यात ७ लाख ८१ हजार ८०५ रुपये वळती केले. अशा तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भादंवि ४२०, ४६८, ४७१, ४०९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी १३ जुलै रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांनी आरोपी पुरुषोत्तम साळोक यास उशिरा रात्री अटक करून न्यायालयात उभे केले. यावेळी न्यायालयाने आरोपी साळोक यास १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.