लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सांगली जिल्ह्यातील मिरज येथे झालेल्या मास्टर्स अॅथलेटीक स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील २३ खेळाडूंनी ५० पदकांची कमाई केली. या स्पर्धेमध्ये ३५ ते ९० वर्षातील महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये ७५ वर्षीय मोहन सिंग तोमर यांनी ८००, १५०० व पाच किलोमीटर चालणे या स्पर्धेमध्ये तीन गोल्ड मिळविले.मिरज येथे पार पडलेल्या अॅथलेटीक्स स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या माध्यमातून त्यांनी विविध पदाकांची कमाई केली. ६० वर्षीय साहेबराव बोरकर यांनी पाच किमी धावणे व १५००, २००९ मीटर स्पर्धेमध्ये अनुक्रमे दोन सुवर्ण व एक रजत पदक मिळविले. ५५ वर्षीय पंडित यदमाळ यांनी गोळाफेक व २०० मीटरमध्ये रजत पदक, गजानन सरदार यांनी हॅमरथो व ४०० मीटर धावणे सुवर्ण व रजत पदक, ५० वर्षीय अनिल खराटे यांनी उंच उडीमध्ये सुवर्ण पदक, ४५ वर्षीय मनोहर म्हळसने यांनी रिले दोडमध्ये रजत पदक, रमेश पवार यांना लांब उडीमध्ये सुवर्णपदक, ४० वर्षीय गजानन जाधव यांनी १००, २०० मीटरमध्ये रजत पदक, प्रसाद पत्की स्टिपलचेसमध्ये रजत अंकुश जाधव व उंच उडीमध्ये कांस्यपदक, डॉ. बाबाराव सांगळे यांना पाच किमी चालणे व भालाफेक अनुक्रमे सुवर्ण व कांस्य पदक तर ३५ वर्षीय विलास सौंदलकर यांना लांब उडी व हॅमरथो सुवर्ण व रजत पदक मिळाले. संदीप शेळके स्टिपलचेस व पाच किमी धावणे रजत व कांस्य, संदीप भिसे लांब उडी रजत, सिद्धार्थ जाधव लांब उडी रजत, रवी लोखंडे उंच उडी व लांब उडी सुवर्ण, रजत पदक पटकाविले.या स्पर्धेमध्ये महिला खेळाडूंनी सुद्धा फार मोठी बाजी मारली. त्यामध्ये ४५ वर्षीय ममता ठाकूर यांनी पाच किमी चालणे, पाच किमी धावणे व १५०० मीटर धावणे दोन सुवर्ण, रजत पदक, ३५ वर्षीय स्मिता जाधव यांनी पाच किमी चालणे व पाच किमी धावणे अनुक्रमे सुवर्ण, रजत कांस्यपदक मिळविले. उषा इंगळे यांनी उंच उडी, १००, २०० मीटर धावणे अनुक्रमे सुवर्ण व दोन रजत, स्वाती शेळके तिहेरी उडी व १५०० मीटर धावणे सुवर्ण व कांस्य, पूर्वा सौंदलकर यांनी पाच किमी चालणे, थाळीफेक अनुक्रमे दोन रजत व कांस्य, वर्षा सांगळे यांनी पाच किमी चालणे व भालाफेक अनुक्रमे रजत व कांस्यपदक मिळविले.वरील खेळाडूंची ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मणिपूर (इंफाळ) येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वरील मास्टर्स खेळाडूंच्या कामगिरीबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष आंबेकर व सचिव डॉ. बाबाराव सांगळे यांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)