बुलडाणा : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनातील भ्रष्टाचार उघड करणाºया नळ पाणीयोजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीने ज्या योजनांची कामे गुणात्मक व दर्जेदार आहेत. तथा निकषानुसार डरडोई पाणी उपलब्धता करून दिल्या जात आहे. अशा योजनांची कामकाज पाहणाºयांना बक्षीस देण्याची भूमिका घेतली आहे. त्याअनुषंगाने भोसा ग्रामपंचायतला पाणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे सुरू ठेवल्याने माजीमंत्री सुबोध सावजी यांचेकडून सरपंच गुंफाबाई शिंदे यांचा सत्कार करून ११ हजाराचे रोख बक्षीस १४ जानवोरी रोजी देण्यात आले. प्रारंभी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच गुंफाबाई शिंदे यांनी माजीमंत्री सुबोध सावजी यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी झालेल्या छोटेखानी सत्कार समारंभात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास चवरे, दत्ता उमाळे, उपसरपंच राजु भोंडणे, माजी सरपंच आश्रुजी करवते, ग्रामपंचायत सदस्य विष्णु खुरद, रेखा चव्हाण, यमुना लोखंडे, सुखदेव सुरवाडे, लोडु चव्हाण, ग्रामरोजगार सेवक दत्ता जाधव, पांडुरंग जाधव, डॉ.मेहेत्रे, दिपक चव्हाण, सुरेश लोखंडे यांच्यासह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना माजी मंत्री सुबोध सावजी म्हणाले की, शासनाने ग्रामीण पाणी पुरवठ्यामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतला लाखो, करोडो रूपयांचा निधी दिला असताना त्यांनी तिचा पाणी पुरवठ्यासाठी उपयोग न करता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १२० गावांना बुलडाणा जिल्हा पाणीपुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने भेटी दिल्या असून यापैकी फक्त भोसा व देऊळगाव माळी ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा सुरळीत चालु असल्याचे आढळून आले, त्यामुळे भ्रष्टाचार करणाºया पाणीपुरवठा अधिकाºयावर २६ जानेवारी २०१८ पर्यंत कारवाई करून भ्रष्टाचाराची रक्कम शासनाच्या खात्यात जमा न झाल्यास व संबंधित अधिकाºयावर कारवाई न झाल्यास बुलडाणा जिल्हा पाणीपुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने भ्रष्ट अधिकाºयाचा खून करण्यात येईल, असा इशाराही माजीमंत्री सुबोध सावजी यांनी दिला. यावेळी भोसा ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बुलडाणा : भोसा ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा समितीला ११ हजाराचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 1:38 PM
बुलडाणा : भोसा ग्रामपंचायतला पाणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे सुरू ठेवल्याने माजीमंत्री सुबोध सावजी यांचेकडून सरपंच गुंफाबाई शिंदे यांचा सत्कार करून ११ हजाराचे रोख बक्षीस १४ जानवोरी रोजी देण्यात आले.
ठळक मुद्देमाजीमंत्री सुबोध सावजी यांचेकडून सरपंच गुंफाबाई शिंदे यांचा सत्कार करून ११ हजाराचे रोख बक्षीस १४ जानवोरी रोजी देण्यात आले. ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच गुंफाबाई शिंदे यांनी माजीमंत्री सुबोध सावजी यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला. १२० गावांना बुलडाणा जिल्हा पाणीपुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने भेटी दिल्या असून यापैकी फक्त भोसा व देऊळगाव माळी ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा सुरळीत चालु असल्याचे आढळून आले.