बुलडाणा : संत निरंकारी मंडळाच्या वार्षिक सत्संगानिमित्त येथे रविवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आध्यात्मासोबतच भक्तीला सामाजिकतेची जोड देत १४० जणांनी रक्तदान केले. या निमित्ताने सकाळी शहरातून रक्तदान जनजागृती रॅलीही काढण्यात आली होती. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या दुचाकी रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले होते. सदर रॅलीत रक्तदानाचा जिवंत देखावा देखील साकारण्यात आला होता.संत निरंकारी मंडळाच्या वतीने दरवर्षी आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांसोबतच स्वच्छता अभियान, वृक्षलागवड आणि रक्तदानाचा उपक्रम देखील राबविला जातो. बुलडाणा येथी वार्षिक संत समागमाच्या निमित्ताने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेसात वाजता शहरातून रक्तदान जनजागृती दुचाकी रॅली काढण्यात आली होती. संत निरंकारी सत्संग भवन क्रीडा संकुल रोड येथून या रॅलीला सुरुवात झाली जुना गाव, मार्केट लाईन, कारंजा चौक, चिखली रोड, सक्यूर्लर रोड, लद्धड हॉस्पिटल या मार्गे सदर रॅली पुन्हा भवनात पोहचल्यावर समारोप करण्यात आला. निरंकारी मंडळाचे महिला व पुरुष सेवादल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या रॅलीदरम्यान चिमुकल्यांनी रक्तदानाचा जिवंत देखावा साकारला होता. ट्रॅक्टरवर साकारलेल्या या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर निरंकारी सत्संग भवनात सकाळी साडेदहा वाजता रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांच्याहस्ते सदर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी शालीकराम चवरे व हनुमान भोसले यांनी संत निरंकार मंडळाद्वारे राबविल्या जाणाºया विविध उपक्रमांची माहिती दिली. संत निरंकारी मंडळाच्या वतीने आध्यात्म आणि भक्तीसोबतच सामाजिकता जोपासण्याचेही मोठे काम केले आहे. सेवादलाने जनजागृती रॅली आणि रक्तदान शिबिराच्या माध्यमातून दाखवून दिलेली शिस्त आदर्शवत आहे. आंधळ्या भक्तीपेक्षा समाजाला दिशा देणारी भक्ती आणि राष्ट्रहिताचे उपक्रम निरंकरी मंडळ राबवित आहे. संत निरकांरी मंडळाची शिस्त, सेवाभाव आणि एकात्मतेची आज गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांनी केले. या शिबिरात महिला व पुरुष सेवादलाच्या एकूण २१० जणांनी रक्तदानासाठी नोंद केली होती. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीच्या वतीने यातील १४० जणांचे रक्तसंकलीत करण्यात आले. सेवादल संचालक संतोष गाडे, सेवादल शिक्षक दिपक इंगळे व सुभाष राजपूत यांच्यासह सेवादलाने परिश्रम घेतले.
बुलडाण्यात भक्तीला सामाजिकतेची जोड; १४० जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 1:20 PM
बुलडाणा : संत निरंकारी मंडळाच्या वार्षिक सत्संगानिमित्त येथे रविवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आध्यात्मासोबतच भक्तीला सामाजिकतेची जोड देत १४० जणांनी रक्तदान केले.
ठळक मुद्देसंत निरंकारी मंडळाच्या वतीने दरवर्षी आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांसोबतच स्वच्छता अभियान, वृक्षलागवड आणि रक्तदानाचा उपक्रम राबविला जातो.वार्षिक संत समागमाच्या निमित्ताने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी साडेसात वाजता शहरातून रक्तदान जनजागृती दुचाकी रॅली काढण्यात आली होती.