हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तंबाखूमुळे मौखिक कर्करोग मोठय़ा प्रमाणात होतो. यासाठी सर्वसामान्य जनतेला तंबाखूमुळे होणार्या वाईट परिणामांची जाणीव होऊन समाजात मोठय़ा प्रमाणात जनजागृती होण्यासाठी शालेय स्तरावर दरवर्षी विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून, शाळा तंबाखूमुक्त राहण्यासाठी शाळा परिसरात तंबाखू बंदी करण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर आज रोजी जिल्हय़ातील २ हजार ४१२ शाळा तंबाखूमुक्त असून, त्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित तसेच खासगी शाळेचा समावेश आहे.मुख स्वास्थ्य हे सर्व शरीराच्या स्वास्थ्याचे गमक आहे. त्याचप्रमाणे मुख स्वास्थ्य व्यवस्थित ठेवले अनेक आजारांची लागण होण्यापासून दूर राहू शकतो. मुख कर्करोग हा कर्करोगामध्ये सर्वात प्रथम क्रमांकामध्ये आढळून येतो. मौखिक कर्करोग जर पूर्वावस्थेत ओळखला तर तो कर्करोगामध्ये परिवर्तित होण्यापासून आपण वाचवू शकतो. यासाठी समाजात जनजागृती होण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण २ हजार ४३0 शाळेपैकी २ हजार ४१८ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ४४८, नगरपालिकेच्या १0७, खासगी अनुदानित ७७७ शाळांचा समावेश आहे. येणार्या काळात जिल्ह्यातील सर्वच शाळा तंबाखूमुक्त करून जनजागृती करण्यात येणार आहे.
दररोज जडते ५ हजार ५00 मुलांना तंबाखूची सवयकेंद्र शासनाने केलेल्या ग्लोबल अँडल्ट टोबेका सर्व्हेनुसार वयाच्या १२ -१५ वर्षातील मुलांचे तंबाखू खाण्याचे प्रमाण १४.६ टक्के एवढे आहे. दररोज जवळपास ५ हजार ५00 मुले, तरुण तंबाखू वापरास सुरुवात करतात. तरुण मुलांची सरासरी १७.८ प्रमाण आहे. २५.८ टक्के मुली त्यांचे वय १५ वर्ष होण्याअगोदरच तंबाखूचे सेवन सुरू करतात. गुटखा, पानमसाला, मावा, हुक्का, तंबाखू मिo्रित पान, खैरी, पेस्ट, मसेरी, तपकीर, यासारख्या वस्तूंचा वापर हा फार प्रमाणात होत असल्याचे सिद्ध होत आहे.