लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने ३ जानेवारीला राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने २ हजार ७७४ बसफेर्या रद्द केल्या होत्या. यामध्ये १ लाख ३८ हजार ७२९ कि.मी. अंतर रद्द झाल्याने एसटी महामंडळाचे जवळपास ३६ लाख ८१ हजार ८६७ रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, ४ जानेवारीला बुलडाणा विभागांतर्गत २ हजार ७७४ बसफेर्या सुरळीत सुरू झाल्या आहेत. कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मंगळवारला दगडफेक झाली. या दगडफेकमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलडाणा विभागाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एसटी बसेस फोडल्याने १ लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान एसटी महामंडळाचे झाले आहे. त्यांनतर ३ जानेवारीला राज्य परिवहन महामंडळाने एकूण ३७२ नियते रद्द केली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील २ हजार ७७४ बसफेर्यांचे १ लाख ३८ हजार ७२९ कि.मी. अंतर रद्द झाले. त्यामुळे एकाच दिवसात बुलडाणा विभागाचे ३६ लाख ८१ हजार ८६७ रुपये उत्पन्न बुडाले. दरम्यान, ४ जानेवारीला कोरेगाव भीमा घटनेच्या अनुषंगाने सर्व वातावरण शांत झाल्याने जिल्ह्यातील बंद केलेल्या २ हजार ७७४ बसफेर्या पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आल्या आहेत.
बुलडाणा : एसटीच्या २ हजार ७७४ बसफेर्या सुरळीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 1:37 AM
बुलडाणा : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने ३ जानेवारीला राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने २ हजार ७७४ बसफेर्या रद्द केल्या होत्या. यामध्ये १ लाख ३८ हजार ७२९ कि.मी. अंतर रद्द झाल्याने एसटी महामंडळाचे जवळपास ३६ लाख ८१ हजार ८६७ रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, ४ जानेवारीला बुलडाणा विभागांतर्गत २ हजार ७७४ बसफेर्या सुरळीत सुरू झाल्या आहेत.
ठळक मुद्देबंदमुळे ३६ लाख ८१ हजारांचे उत्पन्न बुडाले