शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
2
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
3
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
4
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
5
"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
6
"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान    
7
Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
8
अभिमानास्पद! भगवद्गीता, नाट्यशास्त्राला UNESCO ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये मिळालं स्थान
9
Video: Mumbai Indians च्या विजयानंतर नीता अंबानी ड्रेसिंग रूममध्ये! 1,2,3 म्हणताच सगळे ओरडले...
10
Video - प्रसिद्धीसाठी काहीही! धावत्या मेट्रोत तरुणीने वेधलं लक्ष; हँडलला लटकून केली स्टंटबाजी
11
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
12
जगभर : रेल्वेच्या खिडकीतून बेल्जियमच्या लुना बटियन्सने पाहिली अमेरिका!
13
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
14
पतीच्या मृत्यूचा धक्का झाला नाही सहन, शोकाकुल पत्नीनंही संपवलं जीवन, एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
15
ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- "प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला..."
16
तुमचेही पैसे ब्लूस्मार्ट वॉलेटमध्ये अडकलेत? रिफंडसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस फॉलो करा
17
"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव
18
"मी अमितचा हात धरला, बॉयफ्रेंडने गळा दाबला..."; नवऱ्याचा काटा काढणाऱ्या बायकोची कबुली
19
Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
20
५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे

बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 13:29 IST

Buldhana nail loss causes: तीन महिन्यांपूर्वी केस गळतीची लागण झाली होती. याच परिसरात आता ‘नखगळती’ची नवी समस्या समोर आली आहे.

शेगाव (जि. बुलढाणा) : शेगाव तालुक्यात काही गावांत तीन महिन्यांपूर्वी केस गळतीची लागण झाली होती. याच परिसरात आता ‘नखगळती’ची नवी समस्या समोर आली आहे. मागील सहा दिवसांपासून पाच गावांमध्ये या लक्षणांचे ४६ रुग्ण आढळले आहेत. बोंडगाव - १४, कालवड - १३, कठोरा - १०, मच्छिंद्रखेड - ७ आणि घुई - २, अशा पाच गावांत ही लक्षणे आढळली  आहेत.

या घटनेची माहिती समोर येताच आरोग्य विभागाने तातडीने वरील गावांमध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे. 

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. बालाजी आद्रर यांनी रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. तज्ज्ञांच्या मते, या प्रकारामागे दूषित पाणी व पर्यावरणीय घटक कारणीभूत असल्याचा संशय आहे. 

मागील अहवालाची प्रतीक्षा 

केसगळती प्रकरणी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) पथकाने प्रभावित गावांमध्ये तपासण्या केल्या होत्या. मात्र, अद्याप कोणताही अधिकृत अहवाल जाहीर झालेला नाही.

सेलेनियमचे प्रमाण अधिक? 

खारपाणपट्ट्यातील काही भागांतील जमिनीत सेलेनियमचे प्रमाण अधिक असून, झिंकच्या प्रमाणात घट झाल्यामुळे केस व नख गळतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हात व पायांची नखे पोकळ होऊन गळून पडतात, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

रुग्णांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार केला जात आहे. घाबरण्याचे काहीही कारण नाही. -डॉ. प्रशांत तांगडे, जिल्हा साथरोग अधिकारी, बुलढाणा

टॅग्स :ShegaonशेगावHealthआरोग्यdoctorडॉक्टरWaterपाणी