- नीलेश जोशी बुलढाणा - मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे १५ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास एका घराला आग लागून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर दोन घरांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशी व कोणत्या कारणामुळे लागली ही बाब अद्यापही स्पष्ट नाही. या दुर्घटने सुभद्राबाई उकंडा खोडेके (८०) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
डोणगाव येथील वॉर्ड क्रमांक सहामध्ये ही दुर्घटना घडली. सुभद्राबाई उंकडा खोडके या घरात एकट्याच रहात होत्या. त्यांच्या घराजवळच त्यांचा मुलगाही रहात होता. दरम्यान पहाटे अडीच वाजेच्या सुमारास आगीच्या झळा लागल्याने सुभद्राबाई खोडके यांच्या घरानजीक रहाणारे उमेश गणेश चऱ्हाटे यांना जाग आली. एकदम परिस्थिती पहाता तेही घारबरले होते. मात्र ते कसेबसे घराच्या बाहेर पडले. मदत मागोस्तोवर त्यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले होते तर सुभद्राबाई खोडके यांचा आगीत जळाल्याने मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत दोन्ही घरांचे २ लाख ८९ हजार रुपयांचे नुकसान जाले आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी पवन गाभणे यांनी ठामेदार अमरनाथ नागरे यांना माहिती दिली. त्यांच्यासोबतच घटनास्थळही गाठले. अग्नीश्यामक दलासही तातडीने पाचारण करण्यात आले होते. तोवर गावातील अमोल बोरकर, पंकज खाेडके व पोलिस कर्मचाऱ्ायंनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी, डोणगावचे उपसरपंच श्याम इंगळे हेही घटनास्थळी पोहोचले. लगोलग या घटनेची माहिती जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आली. डोणगावचे मंडळ अधिकारी वाघ, तलाठी अनुप नरोटे, संदीप परमाळे, संतोष मानवतकर यांनीही पंचनामा केला. ही आग नेमकी कशामुळे लागली ही बाब अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आगामुळे एका वृद्ध महिलेचा जीव गेला आहे. मृत महिलेचे पार्थिव हे मेहकर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
अन्नधान्य जळून खाकया दुर्घटनेत तीन लाख रुपयांची तीन क्विंटल तूर, तांदुळ , गहू दाळी व इतर दान्य असा १५ हजार रुपयांचा मानल, किराणा सामान, गॅस, टीव्ही, फ्रीज, कुलर, कपडे, शिलाईमशीन, कपाट, संसारोपयोगी साहित्य, मोबाईलसह जवळपास २ लाख ८९ हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. सुभद्रा उंकडा खोडके यांच्या घरासह उमेश चऱ्हाटे यांच्या घराचेही नुकसान झाले आहे.