लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लोकसभा निवडणुकीत पोस्टल मतेही युतीच्या पारड्यात भरघोसपणे पडली आहे. सैन्यदताली जवानांसोबतच निवडणुकीच्या कामात व्यस्थ असलेल्या कर्मचाºयांचाही यात समावेश आहे. मात्र सैन्यदलातील जवानांच्याही मतांचा यात समावेश असल्याने या पडलेल्या पोस्टल मतांची चर्चा अधिक होत आहे. २०१९ मध्ये बुलडाणा लोकसभा मतदारदार संघात तब्बल एकुण मतांच्या २८ टक्के पोस्टल मते ही युतीच्या पारड्यात पडली.२०१४ च्या पोस्टल मतांशी तुलना करता तब्बल २४ टक्क्यांनी ही मते वाढली आहे. २०१४ मध्ये युतीच्या उेदवाराला एकुण पोस्टल मतांच्या तुलनेत ३.७२ टक्केच मते पडली होती. बुलडाणा लोकसभा मतदार संघात पोस्टल मतांची संख्या ही तीन हजार ७०७ आहे. त्यापैकी प्रत्यक्षात ३०८२ मतदान झाले. त्यात दोन हजार २७५ मते वैध ठरली तर ७९२ मते ही अवैध ठरली आहेत. १५ जणांची नोटाल पसंती होती.२०१४ मध्ये युतीला ३.५४ टक्के मते२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीला तीन हजार ६५८ एकूण पोस्टल मतांपैकी १७३ अर्थात ३.७२ टक्के मते मिळाली होती. तर आघाडीचे त्यावेळच्या उमेदवाराला ३२ मते पटली होती. एकुण मतांच्या तुलनेत त्याची टक्केवारी ही ०.८७ ऐवढी येते. यंदा मात्र आघाडीच्याही पोस्टल मतामध्ये वाढ झाली असून ती दहा टक्क्यांवर पोहोचली आहे. तुलनात्मक पाहता आघाडीच्या पोस्टल मतांमध्ये वाढ झाली असली तरी युतीच्या पारड्यात सैन्यदलातील जवानांसह निवडणूक कर्तव्यावरील कर्मचार्यांनीही भरघोस मते टाकल्याचे दिसते.
टपाली मतदारांची २८ टक्के मतेही युतीच्या पारड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 3:42 PM