लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: हाथरस येथील पीडीत कुटुंबास न्याय देऊन भाजपा प्रणीत योगी सरकारच्या निषेधार्थ बुलडाण्यात जिल्हा काँग्रेसच्यावतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहूल गांधी व पक्षनेत्या प्रियंका गांधी ह्या पिडीत कुटुंबाची भेट घेण्यास जात असताना उत्तर प्रदेशातील पोलीसांनी त्यांच्यासोबत धक्का-बुक्की केली. पीडीत कुटुंबाच्या सदस्यांना भेटण्यास विरोध केला. या घटनेचा निषेध म्हणून बुलडाणा येथे जिल्हा काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.या आंदोलनात राजेश एकडे, हर्षवर्धन सपकाळ, दिलीपकुमार सानंदा, मनिषा पवार, शैलेश सावजी, वसीम बागवान व पदाधिकारी उपस्थित होते.
थाली बजाओ आंदोलनहाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतिने ‘ताली - थाली बजाओ’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत अनुसूचित जाती विभागाचे कार्यकर्ते भाजपचे खासदार व आमदार यांचे घर व कार्यालयासमोर टाळी व थाळी वाजवून आंदोलन करणार आहेत. ५ आॅक्टोबरपासून या अदंोलनास सुरूवात झाली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष विजय अंभोरे यांनी दिली.