बुलडाण्यात काँग्रेसचा ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकास घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 17:11 IST2018-06-04T17:11:47+5:302018-06-04T17:11:47+5:30

बुलडाणा : शेतकरी कर्जमाफी, शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार राष्ट्रीयीकृत  बँकांनी शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप करावे, या मागणीकरीता काँग्रेसच्या वतीने गामीण बँकेच्या व्यवस्थापकास ४ जून रोजी घेराव घालण्यात आला.

In the Buldhana, Congress gherao Grameen Bank manager | बुलडाण्यात काँग्रेसचा ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकास घेराव

बुलडाण्यात काँग्रेसचा ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकास घेराव

ठळक मुद्दे शेतकरी जेव्हा-जेव्हा अडचणीत असेल त्यांच्या पाठीमागे काँग्रेस•भक्कमपणे उभी राहील, अशी भूमिका यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. पीककर्ज त्वरित वाटप करण्यात यावे, अन्यथा तालुका व शहर कॉंग्रेस कमिटी बुलडाणाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

बुलडाणा : शेतकरी कर्जमाफी, शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार राष्ट्रीयीकृत  बँकांनी शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप करावे, या मागणीकरीता काँग्रेसच्या वतीने गामीण बँकेच्या व्यवस्थापकास ४ जून रोजी घेराव घालण्यात आला. पावसाळा तोंडावर असल्याने शेती मशागती कामाला वेग आला आहे. यावर्षी हवामान खात्याने वेळेवर व पुरेपूर पाऊस सांगितला असुन शेतकरी सुखावला आहे. परंतु बि-बियाणे, खतांसाठी पीककर्जाची आवश्यकता असल्याने बँका कर्ज देत नाही. तसेच शेतकऱ्यांना उद्दीष्टानुसार पीक कर्ज मिळत नसल्याने सध्या शेतकरी संकटात सापडला आहे. राज्य शासन व केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधातील धोरणामुळे तसेच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरीवर्ग पूर्णत: कोलमडलेला आहे. कॉंग्रेस ही बाब कदापीही खपवून घेणार नाही. कॉंग्रेस पक्ष कायम शेतकऱ्यांसोबत होता आणि राहिल. शेतकरी जेव्हा-जेव्हा अडचणीत असेल त्यांच्या पाठीमागे काँग्रेस•भक्कमपणे उभी राहील, अशी भूमिका यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना नेमून दिलेल्या उद्दीष्टानुसार पीककर्ज त्वरित वाटप करण्यात यावे, अन्यथा तालुका व शहर कॉंग्रेस कमिटी बुलडाणाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात तालुकाध्यक्ष सुनील तायडे, शहराध्यक्ष दत्ता काकस, सुनील सपकाळ, सुरेश सरकटे, गजू आद्रट, भागवत वानेरे, गोविंदा पवार, सुरेश पाटील, दिलीप पाटील, ज्ञानदेव शिंदे, विजय कड, जुनैद खान, सुरोशे, बल्लु गाडेकर, अमित टेलर, मजुद रहेमत, शेख मुजाहिद, बंटी साळवे, रुखमाजी राऊत, •भगवान निकम, अनिल वारे, गौतम वानखेडे, सुभाष इंगळे, बब्लु मावतवाल, कांता चव्हाण, अमोल तायडे यांच्यासह •पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

Web Title: In the Buldhana, Congress gherao Grameen Bank manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.