लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यात कोरोनाचा संसर्ग एप्रिल महिन्यात महत्तम पातळीवर पोहोचल्यानंतर त्यास आता अेाहोटी लागली असली तरी एप्रिलपासून कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मे महिन्यात बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण हे उच्चांकी पातळीवर गेले असल्याचे निदर्शनास येत असून गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक असे १९५ मृत्यू हे मे महिन्यात झाले आहेत. गेल्या पाच महिन्यात झालेल्या ६०६ मृत्यूपैकी तब्बल ३२ टक्के मृत्यू हे मे महिन्यात झाले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.गेल्यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंतच्या सात महिन्यात जिल्ह्यात १३ हजार ६२८ जण कोरोना बाधित झाले होते तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या १२ हजार ८८४ होती. गेल्या वर्षी जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूच्या तुलनेत ३६ टक्के मृत्यू हे सात महिन्यात झाले होते. त्याच्या जवळपास तब्बल ३२ टक्के मृत्यू हे एकट्या मे महिन्यात झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर हा वाढत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. दुसरीकडे २०२१ या वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव हा सातत्याने वाढला. मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेने कमी कोरोना बाधित आढळून आले. मात्र कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले तरी कोरोना संसर्ग कमी झाला.
बुलडाणा : कोरोना रुग्णसंख्येत घट, मात्र वाढते मृत्यू चिंताजनक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 11:03 AM