बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसची खामगावात निदर्शने

By अनिल गवई | Published: October 16, 2023 03:51 PM2023-10-16T15:51:22+5:302023-10-16T15:52:01+5:30

सोयाबीनचे पीक हातचे गेल्याने नुकसान भरपाईची मागणी

Buldhana District declared drought-hit; Congress protests in Khamgaon | बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसची खामगावात निदर्शने

बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसची खामगावात निदर्शने

खामगाव: बुलढाणा जिल्ह्यातील कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाची अनियमितता आणि विविध प्रकारच्या रोगराईमुळे सोयाबीनचे पीक हातचे गले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना नुकसान भरपाईच्या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने साेमवारी उपविभागीय अधिकार्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्यावतीने उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शनेही करण्यात आली.

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकर्यांची काही व्यापार्यांकडून अडवणूक केली जात आहे. काही कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीने खरेदी केली जात आहे. पीकांवरील रोगराईमुळे संकटग्रस्त झालेल्या शेतकर्याना तातडीने आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली. अन्यथा जिल्ह्यात जेलभरो, रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, शहराध्यक्ष सरस्वती खासने, मनोज वानखडे, विजय काटोले, सुरजीत कौर सलुजा, कृउबास सभापती सुभाष पेसोडे, भारती पाटील, माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले, रोहित राजपूत, डॉ. सदानंद धनोकार, सुरेशसिंह तोमर, सुरेश वनारे यांच्यासह आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Buldhana District declared drought-hit; Congress protests in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.