बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य विभागासाठी देण्यात येणाऱ्या २०१६-१७ व २०१७-१८ साठीच्या विविध पुरस्कारांचे २८ मार्च रोजी शिवाजी सभागृहात वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा उमा तायडे होत्या. उदघाटन जि. प. उपाध्यक्षा मंगला रायपुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी अर्थ व बांधकाम सभापती राजेंद्र उमाळे, समाजकल्याण सभापती गोपाल गव्हाळे, कृषी व पशुसंवर्धन सभापती दिनकरराव देशमुख, महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले, मुख्य कार्यकारी अधिकारी शण्मुखराजन एस. यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी प्रास्ताविकाद्वारे आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार, जिल्हास्तरीय पुरस्कार, कायाकल्प राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम राष्ट्रीय पातळी आदी पुरस्कारांबद्दल माहिती दिली.उपकेंद्रामधून २०१६-१७ साठी १५ हजारांचा प्रथम पुरस्कार आरोग्य उपकेंद्र टूणकीस मिळाला तर द्वितीय पुरस्कार १० हजार रुपये आरोग्य उपकेंद्र निमगाव, तृतीय पुरस्कार सोनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रास ५ हजार रुपये मिळाला. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून २५ हजारांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार चिखली तालुक्यातील एकलारा प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाला, द्वितीय क्रमांकाचा १५ हजार रुपये पुरस्कार खामगाव तालुक्यातील अटाळी, तृतीय १० हजार रुपये खामगाव तालुक्यातील रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाला. ग्रामिण रुग्णालयांमधून प्रथम क्रमांकाचा ५० हजारांचा पुरस्कार मलकापूर ग्रामिण रुग्णालयास मिळाला.तर २०१७- १८ करिता उपकेंद्रांमधून प्रथम क्रमांकाचा १५ हजारांचा पुरस्कार आरोग्य उपकेंद्र कुंड, द्वितीय १० हजार आरोग्य उपकेंद्र मांडवा फॉरेस्ट, तृतीय ५ हजारांचा पुरस्कार आरोग्य उपकेंद्र बोराळासमिळाला. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून प्रथम क्रमांकाचा २५ हजारांचा पुरस्कार संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाला, द्वितीय १५ हजार रुपये सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा प्रा.आरोग्य केंद्रास तर तृतीय क्रमाकांचा १० हजार रुपये पुरस्कार मेहकर तालुक्यातील डोणगाव प्रा. आरोग्य केंद्रास मिळाला. ग्रामिण रुग्णालयासाठीचा ५० हजार रुपयांचा पुरस्कार शेगाव उपजिल्हा रुग्णालयाने पटकावला.तसेच कायाकल्प राज्यस्तरीय १ लाखांचा पुरस्कार उपजिल्हा रुग्णालय शेगाव, जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पाडळी प्राथमिक आरोग्य केंद्रास २ लाख रुपये, प्रोत्साहनपर मलकापूर पांग्रा, अटाळी, रोहणा, एकलारा, उमाळी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी ५० हजार रुपये व राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर २ लाख रुपयांच्या पुरस्कारांचा वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत, डॉ. मकानदार, डॉ. आर. डी. गोफणे, डॉ. सांगळे, डॉ. साईनाथ भोवरे, डॉ. खान, डॉ. सावजी, डॉ. खंडारे, डॉ. खिरोडकर, डॉ. बढे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बुलडाणा जि. प. आरोग्य विभागाच्या पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 1:47 PM
बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य विभागासाठी देण्यात येणाऱ्या २०१६-१७ व २०१७-१८ साठीच्या विविध पुरस्कारांचे २८ मार्च रोजी शिवाजी सभागृहात वितरण करण्यात आले.
ठळक मुद्दे ग्रामिण रुग्णालयांमधून प्रथम क्रमांकाचा ५० हजारांचा पुरस्कार मलकापूर ग्रामिण रुग्णालयास मिळाला. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून प्रथम क्रमांकाचा २५ हजारांचा पुरस्कार संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाला.उपकेंद्रामधून २०१६-१७ साठी १५ हजारांचा प्रथम पुरस्कार आरोग्य उपकेंद्र टूणकीस मिळाला.