शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची मोजणी निम्यावर !

By admin | Published: March 05, 2017 2:05 AM

जिल्ह्यात ८७.२९0 किमीची व्याप्ती; ४५ किमी मोजणी पूर्ण

ब्रम्हानंद जाधवबुलडाणा, दि. 0४- नागपूर-मुंबई हा समृद्धी महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातून ८७.२९0 कि.मी.अंतराचा जात आहे. त्यासाठी सयुंक्त मोजणीची प्रक्रिया सुरू असून, जिल्ह्यातील अंतर मोजणी ५२.४६ टक्क्यावर आली आहे. बहुतांश ठिकाणी मोजणी आडवल्या जात असल्याने ४१.४९0 कि.मी.ची मोजणी अद्याप बाकी आहे.राज्य शासनाची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा व देऊळगाव राजा या तीन तालुक्यातून जात आहे. या समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असणार्‍या जमीन मोजणीचे काम सध्या सुरू आहे. हा समृद्धी महामार्ग नागरिकांच्या सोयीसाठी असल्याने या कामात अडथळे येऊ नयेत, यासाठी या प्रकल्पामध्ये जमीनी जात असलेल्या शेतकर्‍यांना या प्रकल्पाची स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी झाडे यांच्यामार्फत सभा घेऊन माहिती देण्यात आली आहे. स्थानिक लोक अडचणी घेऊन आल्यास त्या तक्रारींचे योग्य निरसन करता यावे, याकरिता जिल्हास्तरावर समृद्धी महामार्गाचे कार्यालयही देण्यात आले आहे. सुरूवातीला ड्रोनच्या साहाय्याने समृद्धी महामार्ग जात असल्येल्या अंतराचे सर्वेक्षण करण्यात आले.आता संयुक्त मोजणी करण्याची प्रक्रिया सुरू असून, जवळपास ५२.४६ टक्के मोजणी पूर्ण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गाचे ८७.२९0 किमी अंतर असून, यातील आजपर्यंत एकूण ४५.८00 कि.मी.अंतराची संयुक्त मोजणी झाली आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे मेहकर तालुक्यात एकूण अंतर ३६.१ कि.मी. असून, त्यापैकी २३.९00 कि.मी.ची मोजणी पूर्ण झाली आहे. लोणार तालुक्यातील एकूण अंतर १३.३९२ कि.मी. असून, त्यापैकी ९.२00 कि.मी.ची मोजणी पूर्ण झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील एकूण अंतर २६.८९८ कि.मी. व त्यापैकी १२.७00 कि.मी.ची मोजणी पूर्ण झाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यात एकूण अंतर १0.९00 कि.मी. आहे; मात्र येथे अद्याप मोजणीला सुरूवात करण्यात आली नाही.१0 मार्चपर्यंत करावी लागणार मोजणी पूर्णनागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गासाठी सयुंक्त मोजणीची प्रक्रिया १0 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र अद्याप ४५.८00 कि.मी.च मोजणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे सहा दिवसात ४१.४९0 कि.मी. अंतराची संयुक्त मोजणी करणे प्रशासनासमोर मोठे आवाहन आहे. संयुक्त मोजणीनंतर होणार चित्र स्पष्ट!सध्या सुरू असलेली संयुक्त मोजणीची प्रक्रिया म्हणजे जमीनीचा ताबा घेणे नव्हे तर, कोणाची जमीन किती या महामार्गात आंतभरूत होणार याचे निश्‍चितीकरण आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गामध्ये कोणत्या शेतकर्‍याची किती जमीन जाते हे सयुंक्त मोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. तसेच जमीनीव्यतिरिक्त फळबागा, विहिरी, घरे, जनावरांसाठी बनविलेले गोठे, झाडे किती जातात याची संपुर्ण यादी ही संयुक्त मोजणी प्रक्रियेनंतर समोर येणार आहे. त्यामुळे संयुक्त मोजणीनंतरच प्रत्यक्ष लॅण्ड पुलिंगच्या कामाल सुरूवात होईल.