बुलडाणा: जिल्ह्याकरीता शेळ्या-मेंढ्यांची पीपीआर रोगावरील ३ लाख ६९ हजार ३०० लसींचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. त्यासाठी १२९ पशुवैद्यकीय दवाखान्यात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शेळ्या, मेंढ्यांना पीपीआर रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्याकरीता शेळ्या, मेंढ्यांची पीपीआर रोगावरील लस प्राप्त झाली आहे. सर्व पशुपालक शेतकरी बांधवांनी आपल्याकडे असलेल्या शेळ्या, मेंढ्यांना पीपीआर लसीकरण गावाजवळील पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. पीपीआर या रोगामध्ये शेळ्या, मेंढ्यांंच्या तोंडामध्ये फोड योणे, हगवण लागणे आदी लक्षणे दिसुन येतात. जिल्ह्यासाठी एकुण तीन लक्ष ६९ हजार ३०० लस मात्रा उपलब्ध झालेली आहे. पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये लसीकरण करुन दिल्या जाणार आहे. जिल्ह्यामध्ये एकुण १२९ पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पशुपालकांनी शेळ्या, मेंढ्यांना तातडीने पीपीआर लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. पी. जी. बोरकर यांनी केले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात साडेतीन लाखावर रोग प्रतिबंधक लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 6:06 PM