शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

बुलडाणा जिल्हय़ात वासुदेव करतोय ‘लेक वाचवा, लेक शिकवा’चा जागर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 1:26 AM

बुलडाणा:  गर्भलिंग निदान करण्याची प्रथा पाहता ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानाचा जागर बुलडाणा जिल्हय़ात सध्या सुरू आहे. दरम्यान, जुन्या गाव परंपरेतील नामशेष होऊ पाहणार्‍या वासुदेवाच्या माध्यमातूनही आता यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात जनजागृती अभियालाना वेग पारंपरिक लोककला जपण्याचा प्रयत्न   

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  गर्भलिंग निदान करण्याची प्रथा पाहता ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानाचा जागर बुलडाणा जिल्हय़ात सध्या सुरू आहे. दरम्यान, जुन्या गाव परंपरेतील नामशेष होऊ पाहणार्‍या वासुदेवाच्या माध्यमातूनही आता यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. त्यामुळे वासुदेवाचे गावातील स्थान आणि लेक वाचवाचा संदेश दोन्ही साध्य करण्याचा उद्देश या माध्यमातून पूर्णत्वास नेला जात आहे.मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या उद्देशाने शासनस्तरावरून बेटी बचाओ अभियान हाती घेण्यात आले. त्यासाठी शाळा, सामाजिक संस्था, शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची मदत घेतली जात आहे. महिला व बालकल्याण आरोग्य विभाग जि.प. बुलडाणा अंतर्गत बुलडाणा जिल्हास्तरावर ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ या संदर्भात लोककलेच्या माध्यमातून कलापथकांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्ह्यामध्ये जनजागृती चालू आहे.  लोककलेतून जनजागृतीसाठी काही कलापथक मंडळाची निवड चाचणी जिल्हा परिषदमध्ये घेण्यात आली. यामध्ये महिला बालकल्याण सभापती श्‍वेता महाले, महिला बाल कल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी मेसरे, खरे, पाटील व जि.प. कर्मचारी यांच्यासमोर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यासंदर्भात काही कलासंचांनी आपली कला सादर केली. त्यानंतर या चाचणीमध्ये लोककलावंत गणेश कदम दुधा या कलासंचाची निवड करण्यात आली. लोककलेतून ‘मुलीला वाचवा, मुलीला शिकवा’, माता बाल संगोपन, मुलीचे महत्त्व, मुलींचा जन्मदर कमी होण्याचे कारण शाहीर गणेश कदम यांनी लोककलेतून पटवून दिले. मेहकर तालुक्यात सुलतानपूर आणि बिबी सिंदखेडराजा तालुक्यात शेंदुर्जन व साखरखेर्डा या गावामध्ये त्यांनी त्यांच्या संचासहित कलापथकांच्या माध्यमातून विशेष म्हणजे वासुदेवांच्या माध्यमातून ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ हे महत्त्व पटवून सांगितले. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी या कलापथकाकडून वासुदेवाच्या माध्यमातून  ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची जनजागृती करण्यात येत आहे. 

गावोगावी मिळतोय प्रतिसादगावोगावी जनजागृती करण्यात येत असलेल्या या लोककला पथकाच्या संचामध्ये शाहीर गजानन जाधव, दगडू जाधव, सुभाष सुरडकर, मल्हारी मुळे, शिवाजी गायकवाड, मंगेश कदम, शाहीर गणेश कदम या कलावंतांनी भाग घेतला आहे. सदर कार्यक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, गावातील महिला, पुरुष युवा मंडळी या सर्वांचा प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा