शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला १६ ‘शिवशाही’ बस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 1:04 AM

बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला  १६ शिवशाही बस आल्या असून, टप्प्याटप्प्याने या बस सुरू करण्यात येणार आहेत. सध्या  जिल्ह्यातील सात आगरांमध्ये ४९0 बसफेर्‍यांचा ताफा असून, शिवशाही बसमुळे  जिल्ह्यातील  प्रवाशांचे वातानुकूलित बसच्या प्रवासांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे

ठळक मुद्देसातही आगारांची आधुनिकतेकडे वाटचाल 

ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  राज्य परिवहन मार्ग महामंडळातर्फे ‘शिवशाही’ ही वातानुकूलित बससेवा  महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी सुरू करण्यात येत आहेत; यात बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला  १६ शिवशाही बस आल्या असून, टप्प्याटप्प्याने या बस सुरू करण्यात येणार आहेत. सध्या  जिल्ह्यातील सात आगरांमध्ये ४९0 बसफेर्‍यांचा ताफा असून, शिवशाही बसमुळे  जिल्ह्यातील  प्रवाशांचे वातानुकूलित बसच्या प्रवासांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन  राज्याच्या कानाकोपर्‍यात एसटी बस धावत आहेत.  राज्य परिवहन महामंडळात कालानुरूप एसटीच्या सेवेत बदल करत आहे. नव्या काळात  आधुनिक सेवाही एसटीने सुरू केल्या आहेत; तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी साध्या  बसगाड्यांबरोबरच शहर बसगाड्या, निम आराम बसगाड्या, मिनी बसगाड्या, डीलक्स  बसगाड्या, मिडी गाड्या, वातानुकूलित बसगाड्या अशा वेगवेगळ्या बसगाड्यांचा ताफा  वाढविला जात आहे. त्यानंतर आता ‘शिवशाही’ बसेस महाराष्ट्रभर नवनव्या मार्गावर सुरू  करण्यात येत आहेत. एसटी महामंडळाने शिवशाही बस दाखल करण्याची घोषणा जानेवारी  २0१६ मध्ये केली होती; मात्र आतापर्यंंत बुलडाणा जिल्ह्यातील एसटीच्या ताफ्यात एकही  शिवशाही बस दाखल झाली नव्हती. बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, खामगाव,  शेगाव, मेहकर, मलकापूर व जळगाव जामोद या सातही आगारांतर्गत सुमारे ४९0 बसफेर्‍या  सोडल्या जातात. या सर्व बसफेर्‍या साध्या असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांसाठी वातानुकूलीत  शिवशाही बसचे आतापर्यंंत स्वप्नच ठरले होते; परंतु जिल्ह्याच्या वाट्यावर १६ शिवशाही  बसगाड्या आल्या असून, वायफाय, सीसी टीव्ही व स्लीपर कोचच्या सुविधा असलेल्या या  शिवशाही बस टप्प्या-टप्प्याने जिल्ह्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे साध्या बसगाड्याने प्रवास  करणार्‍या जिल्ह्यातील प्रवाशांना लवकरच वातानुकूलीत शिवशाही बसच्या प्रवासाचा अनुभव घे ता येणार आहे. 

आज होणार पहिलं दर्शनगेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या वायफाय, सीसी टीव्ही आणि स्लीपर कोचच्या  सुविधायुक्त व वातानुकूलीत शिवशाही बसचे पहिले दर्शन ५ डिसेंबर रोजी बुलडाण्यातील  प्रवाशांना होणार आहे. बुलडाणा ते पुणे या बसला ५ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्यानंतर  इतर बसफेर्‍या लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

दीडपट भाडेवाढसाध्या बसगाड्यांपेक्षा शिवशाही  बसचे भाडे हे दीडपट वाढलेले असणार आहे. त्यामध्ये  बुलडाणा ते पुणे मार्गावर जाणार्‍या शिवशाही बसचे भाडे ६३0 रुपये राहणार आहे. तर शेगाव- पुणे जाणार्‍या शिवशाही बसचे भाडे ७३२ रुपये राहणार आहे; परंतु शिवशाही बसचे हे भाडे  ट्रॅव्हलपेक्षा कितीतरी पटीने कमी राहणार असल्याने प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  या बसफेर्‍यांना  मिळणार आहे. 

टॅग्स :Shivshahiशिवशाहीbuldhana bus standबुलडाणा बस स्टॅन्ड