शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेलाच ‘व्हायरल इन्फेक्शन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 6:03 PM

औषधांचा तुटवडा व आरोग्य कर्मचारी गावात फिरकत नसल्याने या आजारांवर नियंत्रण मिळवण्यास आरोग्य यंत्रणेलाच ‘व्हायरल इन्फेक्शन’ जडल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांची ओपीडी ५ हजार २०० च्यावर जात आहे.आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधी साठा उपलब्ध नाही, त्यात खोकल्याच्या औषधींचा तुटवडा असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये ताप, सर्दी, खोकल्यासह श्वसनविकाराचा त्रास होणारे रुग्ण अधिक आहेत. एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिवसाला १०० ते १५० रुग्ण तपासणीसाठी येत असल्याने जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांची ओपीडी ५ हजार २०० च्यावर जात आहे. परंतू औषधांचा तुटवडा व आरोग्य कर्मचारी गावात फिरकत नसल्याने या आजारांवर नियंत्रण मिळवण्यास आरोग्य यंत्रणेलाच ‘व्हायरल इन्फेक्शन’ जडल्याचे दिसून येत आहे.गोरगरीब रुग्णांना वेळीच उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयापेक्षाही प्राथमिक अरोग्य केंद्र व उपकेंद्र जवळचे वाटतात. ग्रामीण भागातील  सर्वसामान्य रुग्णांची आजही प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावरच मदार आहे. प्रत्येक उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) व (स्त्री) तसेच एक अंशकालीन स्त्री परिचर अशा तीन पदांना शासनाने मान्यता दिली आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रांमध्ये १५ कर्मचारी कार्यरत असतात. जिल्ह्यात एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र ५२ असून उपकेंद्र २८० आहेत. परंतू सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’ झपाट्याने पसरसत असून रुग्णांची गर्दी वाढली आहे. बदलते हवामान, त्यातच तापाची साथ सर्दी, खोकला यांसारख्या आजारांनी थैमान घातले आहे.  ढगाळ वातावरणामुळे दमा व त्वचा  विकाराचा त्रास वाढला आहे. सध्याचे वातावरण जलजन्य आजाराच्या वाढीसाठी पोषक असल्याने रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिवसाची ओपीेडी १०० ते १५० पर्यंत जात असल्याचे दिसून येत आहे.  शासकीय रुग्णालयांबरोबर खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी आहे. परंतू अशा परिस्थितीतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी गावोगावी फिरकत नसल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी सुद्धा गावांना भेटी देत नाहीत. आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधी साठा उपलब्ध नाही, त्यात खोकल्याच्या औषधींचा तुटवडा असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाºयांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

आरोग्य केंद्राचा कारभार उपकेंद्राच्या भरवश्यावरएका प्राथमिक आरोग्य केंद्रावर दोन वैद्यकीय अधिकारी असल्यास एकाला ओपीडी बघावी लागते. तर दुसरा अधिकारी मिटींग किंवा गावांना भेटी देणे व इतर कामे करतो. परंतू जिल्ह्यातील काही आरोग्य केंद्रावरील प्रभारी वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदीक दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाºयांना केंद्राच्या ठिकाणी बसण्यास सांगतात. अनेक वैद्यकीय अधिकारी आपल्या वैयक्तीक कामांसाठी उपकेंद्रावरील अधिकाºयांना बालावून त्यांच्यावर कामाचा डोलारा सोपवितात. 

अ‍ॅन्टी बायोटीकचा तुटवडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर औषधांची कमतरता वारंवर जाणवते. सध्या रुग्णांची संख्या वाढलेली असताना काही ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरून माहिती घेतली असता अ‍ॅन्टी बायोटीक व खोकल्याच्या औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचा प्रकार समोर आला. सध्या अ‍ॅन्टी बायोटीक औषधांची गरज असताना रुग्णांना ते वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्यात जावे लागते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य