शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Buldhana: गांगलगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षणांचा खेळखंडोबा! विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

By ब्रह्मानंद जाधव | Published: August 19, 2023 7:15 PM

Buldhana: ​​​​​​​चिखली तालुक्यात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी शाळा व पीएमश्री योजनेतील शाळेच्या माध्यमातून जि.प.शाळांना उभारी देण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे या हेतूला नख लावण्याचे काम शिक्षकांकडून होत असल्याचा प्रकार गांगलगाव जि.प.शाळेत उघडकीस आला.

- ब्रह्मानंद जाधवचिखली - तालुक्यात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी शाळा व पीएमश्री योजनेतील शाळेच्या माध्यमातून जि.प.शाळांना उभारी देण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे या हेतूला नख लावण्याचे काम शिक्षकांकडून होत असल्याचा प्रकार गांगलगाव जि.प.शाळेत उघडकीस आला. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थीनीला शाळेसह वर्गशिक्षकाचे देखील नाव येत नसल्याचा प्रकार समोर आल्याने शिक्षणांचा खेळखंडोबा दिसून येत आहे.

तालुक्यातील गांगलगाव येथील जि. प. प्राथमिक शाळेत १ ते ४ पर्यंत वर्ग व एकूण पटसंख्या ८४ आहे. तर या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पाच शिक्षक आहेत. मात्र, पाच शिक्षकांपैकी दोन शिक्षक हे दांडीबहाद्दर आहेत. शनिवार सकाळच्या शाळेची वेळ सव्वा सात असतानाही ८ वाजेपर्यंत एकही शिक्षक शाळेत पोहचलेले नव्हते. शिवाय शाळेचे गेटही उघडल्या गेलेले नव्हते. ही बाब पालकांना समजल्यानंतर पालकांनी शाळेत दाखल होत गटशिक्षणाधिकारी समाधान खेडेकर यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. याची तातडीने दखल घेत खेडेकर साडेआठच्या सुमारास शाळेला दाखल झाले. उशीराने शाळेत दाखल झालेल्या शिक्षकांची खरडपट्टी काढत पालकांना शाळेच्या प्रगतीकडे लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. शिक्षकांनाही शाळा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एका महिन्याचा अल्टीमेटम दिला आहे.

शिक्षकांच्या गैरहजेरीचे प्रमाण अधिकशाळेवर गजानन म्हस्के, अनिल साळवे, प्रकाश पडघान, ज्ञानेश्वर खंडागळे, देवकुमार टेकाडे या पाच शिक्षकांच्या नियुक्त्या आहेत. यातील गजानन म्हस्के यांनी या महिन्यात दोन दिवस कर्तव्य बजावल्यानंतर ३ ते ५ पर्यंत किरकोळ रजा व ७ तारखेपासून आजारी रजेवर आहेत. प्रकाश पडघान यांनी याच महिन्यात ८, ९ व ११ रोजी किरकोळ रजा आणि त्या पश्चात १७ तारखेपासून विना परवानगी रजेवर आहेत. शनिवारी तीन शिक्षक उपस्थित होते. त्यापैकी एक शिक्षक मिटींग संपवून १० वाजता शाळेत पोहचले, एक शिक्षक ८.२० वाजता शाळेत दाखल झाले. शिक्षकांचा या दांडीबहाद्दरपणा व लेटलतीफपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

कपाटात दारूच्या रिकाम्या शिशाशाळेतील कपाटात दारूच्या रिकाम्या शिशा, ग्लास आदी आढळून आले आहे. काही वर्गखोल्यांना पावसामुळे गळती लागलेली असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे.

पालक आक्रमकया शाळेत शिक्षणाचा सुरू असलेला खेळखंडोबा पाहता गटशिक्षणाधिकारी खेडेकर यांनी शिक्षकांना तंबी देत पालकांना आश्वस्त केले असले, तरी शाळेची प्रगती न झाल्यास शिक्षणमंत्री केसरकर यांच्याकडे तक्रार करण्यासह शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाStudentविद्यार्थी