लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: देशातील पांढरे सोन पिकवणार्या एकूण व्यवस्थेत ३0 टक्के हिस्सा हा महाराष्ट्राचा असतो. यातही विदर्भात कापसाचे पीक घेणार्या शेतकर्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे; मात्र बोंडअळीच्या दुष्टचक्राने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बोगस बिटी बियांण्यांमुळे हा प्रकार घडला असून, शेतकर्यांमध्ये संतप्त भावना आहे. त्यामुळे या कंपन्यांवर कारवाई करत मोबदला म्हणून त्यांच्याकडून व सरकारकडून शेतकर्यांना मदत मिळण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी खा. प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत केली आहे.दिल्ली येथे लोकसभेचे अधिवेशन सुरू असून, १९ डिसेंबर रोजी शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नावर खा. प्रतापराव जाधव यांनी मागण्या मांडत पांढर्या सोन्याची अर्थात कापसामुळे निर्माण झालेल्या शेतकर्यांच्या जीवनातील काळी बाजू मांडली. यावेळी खा. जाधव म्हणाले की, बिटी बियाण्यांवर अळीचा हल्ला होऊ नये म्हणून आवश्यक जीन्स त्यात टाकले जातात; मात्र असे असतानाही जिल्ह्यातील हजारो कापूस उत्पादक शेतकर्यांचा बोंडअळीच्या हल्ल्याने हंगाम हिरावल्या जात आहे. पाच ते सात फुटापर्यंत कपाशी वाढली. बोंडांची संख्या नेहमीपेक्षा दीडपट असल्याने उत्पन्नाची आशाही शेतकर्यांना होती; मात्र पांढर्या सोन्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. १00 क्विंटलच्या आसपास उत्पादन देणार्या शेतामधून १0 क्विंटलही कापूस होऊ शकला नाही. बिटी कॉटनचे बियाणे निर्माण करणार्या कंपन्यासोबत अँग्रीमेंटही शेतकर्यांनी केले होते. तरीही कापसाच्या उत्पादनात म्हणता येईल, असा खास नफा दिसून आलेला नाही. एका अंदाजानुसार ५0 ते ८0 टक्के कापसाच्या पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. कपाशीच्या या नुकसानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकर्यांची नाराजी बियाणे विक्री करणार्या आणि त्यासंबधी अँग्रीमेंट करणार्या कंपन्यांबाबत आहे. शेतकर्यांजवळ बियाणे खरेदी रेकॉर्ड, रिकाम्या बियाण्यांच्या थैल्या व इतर सहायक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने सरकारी आर्थिक मदत मिळण्यास त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्यातील आणि खासकरून विदर्भातील गुलाबी बोंडअळीच्या या हल्ल्यापासून बचावासाठी बिटी कॉटन बियाणे उपलब्ध करणारे दोषी कंपन्यांवर कारवाई करावी, तसेच या कंपन्यांकडून व राज्य सरकारकडून शेतकर्यांना मोबदला मदत म्हणून देण्यात यावा, अशी मागणी खा. प्रतापराव जाधव यांनी केली आहे.
बुलडाणा : बोंडअळीने झालेल्या नुकसानाचा शेतकर्यांना मोबदला द्या - जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:58 PM
बुलडाणा: देशातील पांढरे सोन पिकवणार्या एकूण व्यवस्थेत ३0 टक्के हिस्सा हा महाराष्ट्राचा असतो. यातही विदर्भात कापसाचे पीक घेणार्या शेतकर्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे; मात्र बोंडअळीच्या दुष्टचक्राने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
ठळक मुद्देबोगस बियाणे निर्मिती करणार्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी