बुलडाणा : लोकसभा निवडणुकीची मोजणी सुरु असून, आतापर्यंत हाती आलेल्या कलानूसार भाजप-शिवसेना युतीचे प्रतापराव जाधव यांचा विजय निश्चित मानल्या जात आहे. या पृष्ठभूमीवर युतीचे कार्यकर्ते व समर्थकांनी बुलडाण्यात विजयाचा जल्लोष केला.लोकसभा मतदार संघातून आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार 84 हजार 954 मतांनी युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी आघाडी मारली आहे. प्रतापराव जाधव यांना 3 लाख 32 हजार दोन मते मिळाली आहेत तर डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना 2 लाख 37 हजार 248 दलित वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांना एक लाख 1072 मते मिळाली आहेत. अंतिम निकालाची माहिती अद्याप हाती आली नसली तरी युतीचे प्रतापराव जाधव यांचा विजय निश्चित झाला असल्याने कार्यकर्त्यांनी शिवसेना-भाजप कार्यालयासमोर जल्लोष सुरू केला आहे. त्याशिवाय मतमोजणी मतमोजणी कक्षासमोर सुद्धा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल उधळून जल्लोष करीत आहेत प्रतापराव जाधव यांनी मतमोजणी दरम्यान भेट दिली तेव्हा त्यांनी निकालाबाबत समाधान व्यक्त करीत मतदार बंधूंचे आभार मानले आहेत. हा विषय गेल्या पाच वर्षात युती सरकारने केलेल्या कामाचा विषय असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने दिलेल्या बहुमत आहे. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या संधीमुळेच हा विजय प्राप्त होऊ शकला अशी प्रतिक्रिया प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.
बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019: प्रतापरावांचा विजय निश्चित; समर्थकांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 4:17 PM