शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

बुलडाणा : पैनगंगा नदीतील गौण खनिजामुळे १४४ कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 1:20 AM

बुलडाणा : महामार्ग बांधकामात नदी खोलीकरण करून  जलसंधारणाची कामे करण्याचा नवा पॅटर्न राज्यात सुरू झाला असून,  त्यामुळे राज्याचे १४४ कोटी रुपये वाचले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन  गडकरी यांनी त्यास पुष्टी दिली आहे. या अंतर्गतचा बुलडाणा जिल्ह्यातील पैनगंगा पुनरुज्जीवन प्रकल्प त्या दृष्टीने सध्या अंमलबजावणी स् तरावर आला आहे. राज्यात असे सध्या सहा पथदश्री प्रकल्प होत  असून, त्यातून ९४ दशलक्ष घनमीटर गौण खनीज महामार्ग बांधकामात  वापरण्यात येणार आहे. 

ठळक मुद्दे९४ दशलक्ष घनमीटर गौण खनीजमहामार्ग बांधकामासाठी वापरणार!

नीलेश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महामार्ग बांधकामात नदी खोलीकरण करून  जलसंधारणाची कामे करण्याचा नवा पॅटर्न राज्यात सुरू झाला असून,  त्यामुळे राज्याचे १४४ कोटी रुपये वाचले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन  गडकरी यांनी त्यास पुष्टी दिली आहे. या अंतर्गतचा बुलडाणा जिल्ह्यातील पैनगंगा पुनरुज्जीवन प्रकल्प त्या दृष्टीने सध्या अंमलबजावणी स् तरावर आला आहे. राज्यात असे सध्या सहा पथदश्री प्रकल्प होत  असून, त्यातून ९४ दशलक्ष घनमीटर गौण खनीज महामार्ग बांधकामात  वापरण्यात येणार आहे. दरम्यान, बुलडाण्यातील या  पथदश्री प्रकल्पामुळे अजिंठा-बुलडाणा  रस्त्याला समांतर वाहनार्‍या पैनगंगा नदीमधून दहा लाख २७ हजार  क्यूबिक मीटर गौण खनीज रस्ते बांधकामासाठी उपलब्ध होत आहे. अजिंठा-बुलडाणा-खामगाव या मार्गाला केंद्र शासनाने राष्ट्रीय  महामार्गाचा दर्जा दिला आहे. बुलडाणा विधानसभा क्षेत्रातून गेलेल्या ४९  किमी लांबीपर्यंतच्या या रस्त्याच्या कामासाठी लागणारे गौण खनीज हे  रस्त्याला समांतर गेलेल्या सुमारे २६ किमी लांबीच्या पैनगंगा नदीपात्रातून  घेऊन नदी खोलीकरण करून निघणारे गौण खनीज हे रस्ता कामासाठी  वापरावे, यासाठी जवळपास दहा महिन्यांपासून बुलडाण्याचे आमदार  हर्षवर्धन सपकाळ पाठपुरावा करत होते. त्यास यश येऊन हा प्रश्न निकाली निघाला आहे. विशेष म्हणजे दिल्ली  येथून नागपूरला येत असताना विमानात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांची या प्रकल्पासाठी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी अनुमती मिळवून हा  प्रकल्प मार्गी लावला होता. त्यासाठी पक्षीय भेद बाजूला ठेवून केंद्रीय  गडकरींनी या चांगल्या आणि काँग्रेस आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या  अभ्यासपूर्ण विवेचनामुळे कामाला प्राधान्य दिले होते. २९ नोव्हेंबर  २0१७ मध्येच यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर घेण्यात  आला होता. त्यामुळे हे काम सोपे झाले. आता प्रत्यक्ष अंमलबजावणी  स्तरावर हे काम आले आहे. दरम्यान, महामार्ग बांधकामादरम्यान नदी, नाल्यावरील पुलांचा ब्रीजकम  बंधारा अशा स्वरूपात  राज्यात जवळपास १७६ बंधारेही उभारण्यात  येणार आहे. त्याचे सुतोवाचही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  शनिवारी बुलडाणा येथे केले होते. यापैकी किती बंधारे हे बुलडाणा  जिल्ह्यात होतील, ही बाब मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाही; मात्र या  प्रकल्पामुळे राज्यात महामार्ग बांधकामात नदी खोलीकरणाचा नवा पॅटर्न  सुरू होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात आगामी काळात दोन हजार ७00  कोटी रुपयांची कामे होत असून, जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गासाठी हा  पॅटर्न येत्या काळात उपयुक्त ठरू शकतो.

९४ दशलक्ष घनमीटर गौण खनिजाचा वापरराज्यात सध्या ‘महामार्ग बांधकामात नदीखोलीकरण’ या संकल्पनेंतर्गत  सहा पायलट प्रोजेक्ट सुरू असून, त्यातील पैनगंगा नदी पुनरूज्जीवन हा  एक प्रोजेक्ट आहे. यामध्ये अजिंठा-बुलडाणा-खामगाव या मार्गासाठी  लागणारे दहा लाख २७ हजार क्यूबिक मीटर गौण खनीज रस्ता  कामासाठी वापरण्यात येईल. राज्यात सुरू असलेल्या अशा उपक्रमातून  ९४ दशलक्ष घनमीटर गौण खनीज रस्ता कामात वापरल्या जाण्याचा  अंदाज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले असून,  यापोटी १४४ कोटी रुपयांची बचत झाली आहे. 

शेतीसोबतच मत्स्योत्पादनालाही फायदाबुलडाणा जिल्ह्यातील ४४0 किमी लांबीच्या नद्या व त्यावरील प्रकल्प  मिळून जवळपास १९ हजार हेक्टर क्षेत्रामधील गौण खनीज  रस्ते  कामासाठी वापरल्यास शाश्‍वत सिंचनाचा शेतीला फायदा होऊन सुमारे  १५ कोटींचे वार्षिक उत्पन्न देणार्‍या जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय  विकासाला चालना मिळून १७0 मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांमधील  ११ हजार सभासदांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध होण्यास  मदत होईल. त्यासाठी प्रशासकीय पातळीवरील समन्वय राखणे आता  गरजेचे झाले आहे.

जिल्ह्यात ४४0 किमी लांबीच्या नद्या!बुलडाणा जिल्ह्यातून ४४0 किमी लांबीच्या नद्या वाहत आहेत. यात  प्रामुख्याने पैनगंगा, ज्ञानगंगा, पूर्णा, मस, कोराडी, नळगंगा, विश्‍वगंगा या  प्रमुख नद्यांचा समावेश आहे. एकही नदी ही बारमाही वाहत नाहीत. या  नद्यांमधील गौण खनीजही जिल्ह्यातून जाणार्‍या रस्त्यांच्या विस्तारीत  बांधकामासाठी वापरता येऊ शकते. बुलडाणा जिल्ह्यातून ५८९ किमी  लांबीचे राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. त्यांच्या रुंदीकरणाची कामे सध्या  सुरू आहेत. त्यासाठी जवळपास पाच हजार कोटी रुपये खर्च होत  असून, एक हजार ५७३ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. दोन  हजार ७00 कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत. या रस्त्यांच्या  कामात ४४0 किमी लांबीच्या वाहणार्‍या नद्यांमधील गौण खनिजाचा वा पर केल्यास शासनाचाही मोठय़ा प्रमाणावर पैसा वाचून जलसंधारणाची  कामे व्यापक स्तरावर होऊ शकतात. त्यासाठी गरज आहे ती  अभ्यासाची आणि राजकीय इच्छाशक्तीची! 

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीriverनदीPainganga Bridge Mehkarपैनगंगा पूल मेहकर