शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

Buldhana: भारनियमनाविरोधात शिवसेना आक्रमक, महावितरण कार्यालयात धडक लोडशेडिंग थांबवा, अन्यथा...

By ब्रह्मानंद जाधव | Published: September 05, 2023 6:01 PM

Buldhana News: पावसाने ओढ दिल्याने पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यातही महावितरणच्या लोडशेडिंगचा खोडा निर्माण होत आहे. भारनियमन विरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक होऊन ५ सप्टेंबर रोजी येथील महावितरण कार्यालयात धडक दिली.

- ब्रह्मानंद जाधव  बुलढाणा - पावसाने ओढ दिल्याने पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यातही महावितरणच्या लोडशेडिंगचा खोडा निर्माण होत आहे. भारनियमन विरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक होऊन ५ सप्टेंबर रोजी येथील महावितरण कार्यालयात धडक दिली. लोड शेडिंग न थांबविल्यास महावितरणाने परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर व जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात शिवसेनेने दिला.

शिवसेनेने महावितरणाच्या अधीक्षक अभियंता यांना ५ सप्टेंबर रोजी निवेदन देऊन भारनियमन बंदची मागणीही केली. बुलढाणा जिल्ह्यात घाटावर आणि घाटाखाली पावसाने वेगवेगळे स्वरूप यंदा दाखवले. घाटावर दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. लोडशेडिंगच्या शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बंद आहेत. पीक परिस्थिती दुष्काळाची असल्याने आणि त्यात ऑगस्ट पूर्णतः कोरडा गेला. सप्टेंबरमध्ये देखील पावसाची शाश्वती कमी-अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे आहेत. उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतातून पीक जगवण्याचा आटापिटा शेतकरी करत आहेत. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांकडून पाण्याचा उपसा वाढला आहे. महावितरणकडून लोडशेडिंग सुरू केली आहे. लोडशेडिंग संपल्यानंतरही पूर्ण क्षमतेने वीज मिळत नाही. होल्टेज नसल्याने कृषिपंप चालत नाहीत. त्यामुळे शेतकरी हैराण आहेत.

लोडशेडिंगची वेळ जाहीर करून त्यानंतर किमान पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा शेतकऱ्यांना व्हावा, महानगरांमध्ये होल्डिंगवर लावण्यासाठी वीजपुरवठा होतो; परंतु शेतकऱ्यांना मात्र पूर्ण क्षमतेने वीज मिळत नाही. त्यांना आणखी अडचणीत आणल्या जाते, असे अनेक प्रश्न शिवसेनेच्या वतीने येथील महावितरणाच्या अधीक्षक अभियंत्यासमोर उपस्थित करण्यात आले. महावितरणाने आपला कारभार सुधारून पूर्ण वेळ व पूर्ण क्षमतेने वीज द्यावी नाही, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर व जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह प्रा. सदानंद माळी, तालुकाप्रमुख लखन गाडेकर, विधानसभा संघटक अशोक इंगळे, सुधाकर आघाव, डॉ. नंदिनी रिंढे, वर्षा सोनुने, गजानन उबरहंडे, अशोक गव्हाणे, विजय इतवारे, एकनाथ कोरडे, मोहन निमरोट, राहुल जाधव, गजानन चौधरी, बी. टी. म्हस्के, बंटी कपूर, सुधाकर मुंढे, विजय भोसले, मंगेश चव्हाण, किरण दराडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाelectricityवीज