सिंदखेडराजा : तालुक्यातील साखरखेर्डा येथील विद्यार्थ्यांनी बहुउद्देशिय सौर उर्जेवर चालणारे पेरणी यंत्र तयार करुन सिंदखेड राजा येथील तालुका विज्ञान मेळाव्यात प्रात्यक्षिक दाखवत प्रथम क्रमांक मिळवला. सोलर उर्जेवर चालणारे पेरणीयंत्र पाहणाºयांची गर्दी होत असून यंत्र तयार करणाºया विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.साखरखेर्डा येथील एस.ई.एस. हायस्कूलमध्ये आठव्या वर्गात शिक्षण घेणाºया अंकुश अशोक इंगळे आणि चेतन मगनसिंग रबडे या दोन विद्यार्थ्यांनी सतत चार दिवस परिश्रम घेवून आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करीत सोलर उर्जेवर चालणारे पेरणीयंत्र तयार केले. हे यंत्र तयार करीत असताना आपल्या लहानपणीच्या खेळण्यात काय काय आहे, याची उकल करीत त्यांनी एक-एक पार्ट जमा केला. कुणाचेही मार्गदर्शन न घेता त्यांनी दिवसरात्र मेहनत घेवून हे कृषीयंत्र तयार केले. त्यात पेरणीयंत्र कसे चालते, याचे प्रात्यक्षिक त्यांनी करुन दाखविले. या कृषी यंत्राची माहिती अंकुश इंगळे आणि चेतन रबडे यांनी तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात दिली. त्या यंत्राला प्राथमिक गटातूनन प्रथम क्रमांक मिळाला. त्याचबरोबर निबंध स्पर्धेतही चेतन रबडे याने प्रथम क्रमांक मिळविला. तर सचिन खराडे याने भाषण स्पर्धेत तृतीय आणि लोकसंख्या आणि शिक्षण या विषयात मगनसिंग रबडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन कै.तुकाराम कायंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुम्हणा येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी गटविकास अधिकारी विलास भटकर, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, संस्थेचे सचिव आत्माराम कायंदे, सहसचिव शिवराज कायंदे, विज्ञान शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक नागरे, प्रविण गवई, प्राचार्य संतोष दसरे, प्रताप पागोरे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
बुलडाणा : साखरखेर्डाच्या विद्यार्थ्यांनी तयार केले सौर उर्जेवर चालणारे पेरणी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 2:17 PM
सिंदखेडराजा : तालुक्यातील साखरखेर्डा येथील विद्यार्थ्यांनी बहुउद्देशिय सौर उर्जेवर चालणारे पेरणी यंत्र तयार करुन सिंदखेड राजा येथील तालुका विज्ञान मेळाव्यात प्रात्यक्षिक दाखवत प्रथम क्रमांक मिळवला.
ठळक मुद्देएस.ई.एस. हायस्कूलच्या इयत्ता आठवीतील अंकुश अशोक इंगळे आणि चेतन मगनसिंग रबडे या विद्यार्थ्यांची प्रतिकृतीतालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात या प्रतिकृतीने मिळविला पहिला क्रमांक