- अनिल गवई खामगाव - वाद...विवाद आणि भांडणे ही सामान्यांमध्ये आणि त्यांच्या घरातच होतात असे नाही, तर वेडसर आणि बेघरांच्या जीवनातही उपरोक्त गोष्टी्चे ग्रहण असते. याचा प्रत्यय खामगाव शहरातील शहर पोलीसांना नुकताच आला. पोलीसांनी दोघांना आवरले. त्यांची व्यथा ऐकून घेतली. प्रेमात धोका बसल्याने, वेडा झालेल्या एकाने आपली आपबिती कथन केली. पोलीसांना त्याचे मर्म समजताच, खाकीतील माणुसकी जागृत झाली. भांडण करणार्यापैकी एकाला जेवण , त्याला हक्काचा निवाराही मिळवून देत, त्याचे पुर्नवर्सन केले.
आपल्या हद्दीत दुसरा वेडसर आल्याने, शहर पोलीस स्टेशन समोरच ते एकमेकांच्या जीवावर उठले. एकमेकांना यमसदनी पाठविण्याची खूणगाठ मनाशी बांधत एकाने दुसर्याचा खात्मा करण्यासाठी एकदुसर्यावर वार केले. काही कळायच्या आतच त्यांच्यात लथ्थाप्रहार सुरू झाले. एकाने शहर पोलीस स्टेशनच्या आवार भींतीची तक्रार पेटी अखडून दुसर्याचे डोके पॐोडले. पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या पोलीसांच्या लक्षात ही बाब येताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. भांडण आवरून दोघांनाही ताब्यात घेतले. सुरूवातीला पोलीसी खाक्या दाखवित त्यांना वठणीवर आणले. पोलीसांनी भागविली भूकजोरदार भूक लागल्याने आपण त्याच्या परिसरात आल्याचे एकाने पोलीसांना सांिगतले. म्हणून त्याने मारहाण केल्याची वस्तुस्िथती समजताच उपस्थित पोलीसांनी त्याची भूक भागविली. सुरूवातीला प्रपॐुल टेकाडे यांनी त्याला नास्ता करण्यासाठी पैसे दिले. तर डीबी पथकाचे प्रमुख मोहन करूटले यांनी त्याला जेवण आणून दिले. भूक क्षमल्यानंतर पोलीसांनी त्याची व्यथा ऐकली. त्यानंतर त्याचे पुर्नवसन करण्याचे ठरविले.
हक्काचा निवाराही दिला.चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील नंदकिशोर पालवे यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानात प्रवेश मिळवून देत, हक्काचा निवारा मिळवून दिला. अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, शहर पोलीस निरिक्षक शांतीकुमार पाटील यांची विशेष परवानगी घेऊन डीबी पथक प्रमुख मोहन करूटले यांनी सहकार्यांच्या मदतीने त्याला दाखल केले. शहर पोलीसांची विनंती स्वीकारून सेवा संकल्पचे नंदकिशोर पालवे यांनी त्याचा सांभाळ करण्यासाठी नम्रपणे होकार दर्शविला. त्यानंतर आरती पालवे आिण सेवा संकल्पमधील सेवाव्रतींनी एका वेडसराचा स्वीकार केला.