शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

बुलडाणा : तीन हजारांची लाच घेताना वनरक्षकाला रंगेहात अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:43 AM

बुलडाणा: शेतात वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा पंचनामा करून वाढीव रक्कम देण्यासाठी ३ हजारांची लाच स्वीकारताना गिरडा बिटचे वनरक्षक ज्ञानेश्‍वर गायकवाड यास लाचलुचपत विभागाने ९ जानेवारी रोजी रंगेहात पकडले.

ठळक मुद्देआरोपी : गिरडा बिटचे वनरक्षक ज्ञानेश्‍वर गायकवाड वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा पंचनामा करुन रक्कम वाढवून देण्यासाठी स्वीकारली लाच

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शेतात वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा पंचनामा करून वाढीव रक्कम देण्यासाठी ३ हजारांची लाच स्वीकारताना गिरडा बिटचे वनरक्षक ज्ञानेश्‍वर गायकवाड यास लाचलुचपत विभागाने ९ जानेवारी रोजी रंगेहात पकडले.बुलडाणा तालुक्यातील गिरडा येथील मधुकर पांडुरंग थोरात यांनी ८ जानेवारी रोजी लाचलुचपत विभाग बुलडाणाकडे तक्रार दिली होती की, वनरक्षक ज्ञानेश्‍वर गायकवाड हे त्यांच्या व त्यांच्या आईच्या नावे असलेल्या शेतीमध्ये वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा पंचनामा करून वाढीव रक्कम देण्यासाठी ३  हजार रुपये लाचेची मागणी करीत आहेत. या तक्रारीवरून ८ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या पडताळणी कार्यवाहीमध्ये पंचासमक्ष  आरोपी वनरक्षक ज्ञानेश्‍वर माधव गायकवाड यांनी शेतीमध्ये वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा पंचनामा करून वाढीव रक्कम देण्यासाठी ३ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर ९ जानेवारी रोजी केलेल्या कार्यवाहीदरम्यान जनरक्षक ज्ञानेश्‍वर गायकवाड यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारली. यावेळी लाचलुचपत विभागाचे कर्मचार्‍यांनी वनरक्षक ज्ञानेश्‍वर गायकवाड यांना ३ हजार रुपये लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले. ७, १३ (१)(ड) सह १३(२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुनीता नाशिककर, पोलीस उपअधीक्षक शैलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.

 

टॅग्स :Arrestअटकbuldhanaबुलडाणाforest departmentवनविभाग