लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बुलडाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने कार्यगौरव पुरस्कार २३ डिसेंबर रोजी प्रदान करण्यात आला.राधेश्याम चांडक यांच्यातर्फे बुलडाणा अर्बनचे अकोला विभागीय व्यवस्थापक विठ्ठल दळवी यांनी अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळांतर्गत अकोला येथील स्वराज्य भवन प्रांगणात शनिवारपासून सुरू झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात या पुरस्कारचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरूकुंज मोझरी येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे हे होते. हा एक मानाचा पुरस्कार बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांना मिळाला आहे.
बुलडाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांना कार्यगौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:57 AM
बुलडाणा : बुलडाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने कार्यगौरव पुरस्कार २३ डिसेंबर रोजी प्रदान करण्यात आला.
ठळक मुद्देअकोल्यातील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान