- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: विधीमंडळाच्या दालनापर्यंत गेलेल्या बुलडाण्यातील स्वच्छतेच्या प्रश्नावर पालिकेने आता पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. आरोग्य मंत्र्याच्या कारवाईच्या अल्टीमेटमचा पालिकेने धसका घेतला असून शहरात स्वच्छतेच्या दृष्टीने नवनविन प्रयोग आजमाविण्यात येत आहेत. बुलडाण्यात आता स्वच्छ भारत का ईरादा असे गीत वाजवित कचरा गोळा करण्यात येत असून, गाण्याच्या अवाजाने कचरा गाड्या बुलडाणेकरांचे लक्षवेधत आहेत.बुलडाणा शहरातील स्वच्छता, डेंग्यूची साथ, पाणी प्रश्न यासारख्या अनेक मुद्दयावर बुलडाणा नगर पालिकेने आवश्यक त्या उपायायोजना न केल्यास बुलडाणा पालिका प्रशासनाविरोधात गंभीर कारवाईचा अल्टीमेटमच राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मागील महिन्यात दिला होता. बुलडाणा पालिकेचा प्रश्न विधीमंडळाच्या दालनातही गाजला. या अल्टीमेटची बुलडाणा पालिकेने धास्ती घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठीच शासनाकडून ह्यस्वच्छ भारत अभियानह्ण राबविण्यात येत असून या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बुलडाणा पालिकेने आता स्वच्छतेवर वाजणाऱ्या गाण्यांची मदत घेण्यास प्रारंभ केला आहे. कचरा विलगीकरणाला गती देण्यासाठी कचरा गोळा करणाºया गाड्यांवर ह्यस्वच्छ भारत का ईरादा कर लिया हमने!ह्ण असे गीत वाजविले जात आहे. सकाळी-सकाळी कचरा गोळा करायला आलेल्या गाडीवर हे गाणे ऐकताच सर्वांचेच याकडे लक्ष जात आहे. या गीतामुळे कचरा गोळा करण्यास चांगलीच मदत होत आहे. शहरात जवळपास २५ पेक्षा जास्त गाड्या सध्या फिरत असून यामध्ये काही नविन गाड्या वाढविल्याची माहिती आहे. बुलडाणा पालिकेकडून पहिल्यादांच हा प्रयोग राबविण्यात येत असून, स्वच्छ भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिकेचा हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो हे, लवकरच समोर येईल. बुलडाणा पालिकेचा कचरा वारंवार चर्चेतस्वच्छ भारत अभियानातंर्गत राज्यातील सर्वच नगर पालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासनाकडून थेट घरातूनच कचरा उचलण्यात येत आहे. मात्र बुलडाणा पालिका गेल्या दोन महिन्यापासून कचºयाच्या बाबतीत वारंवार चर्चेत येत असल्याचे दिसून येते. मागील महिन्यात स्वच्छेतचा प्रश्न आरोग्य मंत्र्यांपर्यंत गेला, तर काही विरोधकांनी चक्क पालिकेच्या आवारातच प्रभागातील कचरा टाकला होता. शहरात कचरा कुंड्यांची गरजपूर्वी बुलडाणा शहरात ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सध्या त्या ठिकाणी कचरा कुंड्या नसल्याने अनेक नागरिक रस्त्यावरच कचरा फेकतात. परिणामी, काही ठिकाणी अस्वच्छता पसरत असल्याचे चित्र आहे. घंटा झाली बंद!सकळच्या सुमारास घरासमोर घंटा वाजली की, प्रत्येकजण कचरागाडी आली, असे समजून जायचे. काही वर्षापासून राज्यभरातील नगर पालिकांकाडून कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाड्या सुरू केले आहेत. मात्र बुलडाण्यात आता घंटा वाजवित येणाºया गाडीवर आता स्वच्छतेचे गीत ऐकायला मिळत आहे.
बुलडाण्यात घुमतोय 'स्वच्छ भारत का ईरादा'चा आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 5:32 PM