- संदीप वानखडेबुलढाणा : जिल्ह्यातील लोणार, चिखली, जळगाव जामोद, शेगाव आणि नांदुरा या बाजार समित्यांसाठी सकाळी ८ वाजतापासून मतदानास प्रारंभ झाला आहे. सकाळी १० वाजेपर्यंत पाचही बाजार समित्यांसाठी २०़ ५० टक्के मतदान झाले हाेते.
बुलढाणा जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांसाठी निवडणूक प्रक्रीया सुरू आहे़ पाच बाजार समित्यांचे निकालही जाहीर झाले आहेत़ त्यानंतर उर्वरीत पाच बाजार समित्यांसाठी रविवारी सकाळी ८ वाजपासून मदतानास प्रारंभ झाला़ सकाळी १० वाजेपर्यंत काही ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह तर काही ठिकाणी मतदान संथगतीने सुरू हाेते़ सकाळी दहा वाजेपर्यंत जळगाव जामाेद बाजार समितीसाठी ३१़ ९९टक्के, लाेणार बाजार समितीसाठी १८़ ०४ टक्के, चिखलीसाठी १७़ ८० टक्के, नांदुरा १६.८६ टक्के आणि शेगाव बाजार समितीसाठी २३़ ७० टक्के मतदान झाले हाेते़
दुपारी १२ पर्यंत ५५़ २५ टक्के मतदानसकाळी संथ सुरू झालेले मतदान दुपारपर्यंत वाढले हाेते़ दुपारी १२ पर्यंत ५५़२५ टक्के मतदान झाले हाेते़ यामध्ये जळगाव जामाेदमध्ये ६७़ ७७ टक्के, लाेणारसाठी ५८़ ६४ टक्के, चिखली ४९़९६ टक्के, नांदुरा ४३ टक्के, शेगाव ६८़ ५४ टक्के मतदान झाले हाेते़
लाेणारमध्ये महिला मतदारांमध्ये उत्साहलाेणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी आज स्थानिक श्री शिवाजी हायस्कुलमधील चार मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजता पासून मतदान सुरू झाले आहे़ यावेळी सकाळ पासूनच मतदानासाठी मतदारांच्या लांबलचक रांगा होत्या़ विशेषतः महिलांमध्ये उत्साह हाेता़ बाजार समितीची निवडणूक पहिल्यांदाच अटीतटीची होतांना दिसून येत आहे. मविआ विरुद्ध सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) यांच्यातच सामना रंगताना दिसून येत आहे.