बुलडाणा, दि. ७- एचआयव्ही संसर्गित व्यक्ती व अतिजोखमीच्या व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, त्यासाठी एक विशेष अभियान राबविण्यात येणार आहे, तसेच जागतिक एड्स दिन १ डिसेंबर रोजी लाभार्थींना लाभ दिला जाईल. जिल्हा परिषद मुख्याधिकारी दीपा मुधोळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती आणि एच. आय. व्ही., टीबी समन्वय समिती सभा ७ ऑक्टोबर राजी संपन्न झाली. या बैठकीत एड्सग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेला अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय कुटुंबे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, डॉ. रवींद्र गोफणे, डॉ.मीनल कुटुंबे, प्रमोद टाले, डॉ.संदीप साळवे, डॉ. गायकवाड, डॉ. आवाके, बी.डी.वाघ, मेहेंद्र सौभागे, ए.व्ही. कुळकर्णी, प्रमोद एंडोले यांची उपस्थिती होती.जिल्हा कार्यक्रम अधिकारी, प्रमोद टाले यांनी माहे जुलै ते सप्टेंबर च्या एच.आय.व्ही. तपासणी व उपचाराची आढावा माहिती दिली. सभेमध्ये रक्तपेढी, गुप्त आजार तपासणी केंद्र, टीबी, अशासकीय संस्था यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी अशासकीय संस्थांच्या कामाचे महत्त्व विषद केले, तसेच यानंतर कार्यात गती आणण्याच्या सूचना केल्या. सभेला रोशन रहांगडे, मंगला उमाळे, गजानन देशमुख, वैशाली इंगळे, गजानन जायभाये, अनिल सोळंके, आम्रपाली इंगळे, संदीप राऊत, डी.एन. खडसे, भागवत कव्हळे, अश्विनी बैरागी, पी.एन.वैद्य, प्रीती श्रीवास्तव, आकाश मोहिते, गजानन खर्चे आदी उपस्थित होते.
एड्सग्रस्तांच्या मदतीसाठी बुलडाणा जिल्हा परिषदेचे विशेष अभियान
By admin | Published: October 08, 2016 1:50 AM