शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

Buldhana ZP : विषय समिती सभापतींच्या निवडणुकीकडे लागले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 2:52 PM

तांत्रिक कारणामुळे ती होऊ शकली नाही. परिणामी १० जानेवारी रोजी ही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आता विषय समिती सभापतीपदांच्या निवडणुकीकडे लक्ष लागले असून पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी या समिती सभापतीपदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.मुळात जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर किमान १५ दिवसांच्या आत ही विषय समिती सभापतीपदाची निवडणूक होणे क्रमप्राप्त आहे. यासंदर्भात नऊ जानेवारी रोजीच निवडणुकीची तारिख निश्चित झाली असती, मात्र तांत्रिक कारणामुळे ती होऊ शकली नाही. परिणामी १० जानेवारी रोजी ही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडीने अंतिमक्षणी जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या परिघातून भाजपला दूर सारत सत्ता स्थापन केली. ही सत्ता स्थापन होताना पडद्यामागे मोठ्या नाट्यमय घडामोडी झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आता विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीबाबत उत्सूकता लागून राहली आहे. महाविकास आघाडीत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसकडे अध्यक्षपद व शिवसेनेकडे उपाध्यक्षपद आल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ व बांधकाम सभापतीपद येणार असल्याचे निश्चित झाले आहे. यापदासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतंर्गत मोठी रस्सीखेच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अद्याप राजकीयस्तरावर त्याबाबत महाविकास आघाडीमध्ये अधिकृतस्तरावर चर्चा झाली नसली तरी अर्थ व बांधकाम सभापतीपद हे राष्ट्रवादीच्या कोट्यात पडणार आहे, हे निश्चित आहे. उर्वरित समत्यांमध्ये तिन्ही पक्षांना प्रत्येकी एक सभापतीपद मिळणार आहे हे महाविकास आघाडीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यातच स्पष्ट झालेले आहे. आता फक्त कोणत्या सदस्याला ते दायचे आहे, हे निश्चित होणे बाकी आहे. दुसरीकडे नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्षा या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या दिल्ली येथील कार्यालयासही येत्या दोन दिवसात भेट देणार असून काँग्रेसतंर्गत बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार असलेले काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांची त्या भेट घेणार आहेत. त्यानंतरच प्रसंगी १४ जानेवारी रोजी त्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.ते तीन सभापती कोण?महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार तिन्ही पक्षांना जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येकी दोन पदे मिळणार आहेत. त्यामुळे आता कृषी व पशुसंवर्धन सभापती, महिला व बालकल्याण सभापती, समजा कल्याण सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार हा उत्सूकतेचा विषय ठरला आहे. यापैकी महिला व बालकल्याण आणि समाज कल्याण समिती सभापती महत्त्वाचे राहणार असून महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी महिलेची तर समाज कल्याण समिती सभापतीपदी अनुसुचीत जाती, जमातीमधील सदस्याची निवड करणे क्रमप्राप्त आहे. उपाध्यक्षांकडेही एका समितीचा पदभार द्यावा लागणार आहे. तो नेमको कोणता देणार आहे हे अद्याप निश्चित नाही. जिल्हा परिषदेच्या एकूण दहा विय समित्या असतात. त्यापैकी चार सभापतींची निवड होईल व अन्य दोन विषय समिती सभापतींची निवड ही जिल्हा परिषद अध्यक्षच करतात. त्यामुळे त्या दोन जागांवर नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागून आहे.

पवार सहाव्या महिला अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या ५७ वर्षाच्या इतिहासात सहाव्या महिला अध्यक्ष जिल्हा परिषदेला लाभल्या असून यामध्ये सर्वात कमी वयाच्या जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मनिषा पवार यांच्याकडे बघितल्या जाते. यापूर्वी काँग्रेसच्या नंदा कायंदे ( १९९७ ते ते १९९८), अनिता रणबावरे ( २००५ ते २००७), वर्षा वनारे (२०१२ ते २०१४), अलका खंडारे (२०१४ ते २०१७) आणि उमा तायडे (२०१७ ते २०२०) यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला होता. आता पुन्हा मनिषा पवार यांच्या रुपाने जिल्ह्यास पुन्हा महिला जिल्हा परिषद अध्यक्ष लाभल्या आहेत. गेल्या एक तपापासून महिलांचाच जिल्हा परिषद अध्यक्षपदावर वरचष्मा राहलेला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषद