शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कृषी महोत्सवानिमित्त शुक्रवारी खामगावात बैलगाडी दिंडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 1:16 AM

खामगाव : खामगाव शहरात होऊ घातलेल्या कृषी महोत्सवानिमित्त शहरातून भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देशेतकर्‍यांनी मोठय़ा संख्येने  सहभागी व्हावे - आमदार अँड. आकाश फुंडकर

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव शहरात होऊ घातलेल्या कृषी महोत्सवानिमित्त शहरातून भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १६ फेब्रुवारी रोजी  सकाळी ११ वाजता शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथून कृषी महोत्सव जनजागृती दिंडी निघेल. यामध्ये खामगाव मतदार संघातील शेतकर्‍यांनी मोठय़ा संख्येने  सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.पश्‍चिम विदर्भातील सर्वात मोठा  व भव्यदिव्य असा कृषी महोत्सव प्रथमच खामगावात आयोजित करण्यात आला आहे.  १६ फेब्रुवारी ते २0 फेब्रुवारीपयर्ंत जलंब रोडवरील पॉलीटेक्निक कॉलेजच्या मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या प्रारंभदिनी प्रचार व प्रसारासाठी शुक्रवारी भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर दिंडी निघत आहे. याबाबत १२ फेब्रुवारी २0१८ रोजी भाजपा कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व सरपंचांची बैठक पार पडली. बैठकीला अँड. आकाश फुंडकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख ता.अध्यक्ष शरदचंद्र गायकी, सरचिटणीस डॉ. एकनाथ पाटील, सुरेश गव्हाळ, शेगाव कृउबास सभापती गोविंदराव मिरगे, कृउबास संचालक दिलीप पाटील, जि.प.सदस्य पुंडलिक बोंबटकार, पं.स.सदस्य विलास काळे, युवराज मोरे, तुषार गावंडे, राजेश तेलंग, ज्ञानदेवराव मानकर, ज्ञानदेव चिमणकार, लाला महाले, सावरकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.  प्रथमच खामगावात अतिभव्य असा कृषी महोत्सव होत आहे.  शेतक-यांसाठी हा महोत्सव नवसंजीवनी ठरणारा आहे. राज्यात भाजपा सरकार आल्यापासून शेतकर्‍यांचे  उत्पन्न दुप्पट करण्याचे  व त्याचे जीवनमान उंचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  त्यासाठीच संपूर्ण राज्यात कृषी महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात नवीन कृषी तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती, वनौषध वनस्पती, नवनवीन जातीचे बी-बियाणे, कृषी क्षेत्रातील यांत्रीकीकरण, कृषी संलग्न पुरक व्यवसाय, पशुपालन, फलोत्पादन आधारीत काढणी पश्‍चात तंत्रज्ञान,  सांस्कृतिक कार्यक्रम असे भरपूर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक ठरणार्‍या कृषी महोत्सवातून कृषी विकास करण्याची चांगली संधी या माध्यमातून आली आहे. कृषी विभागामार्फत ज्या शेतकर्‍यांना ट्रॅक्टर देण्यात आले आहे, असे लाभार्थी शेतकरी सहभागी होणार आहेत.  तसेच मतदार संघातील शेतकर्‍यांनी आपले बैल व बैलगाडी सजवून सहभागी व्हावे. राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून  सुरुवात होईल. ही कृषी रॅली प्रमुख मार्गाने जावून दिंडीचा समारोप कृषी महोत्सव स्थळी, पॉलीटेक्नीक ग्राऊंड जलंब रोड येथे होईल. या कृषी दिंडीत मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आ. अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. 

टॅग्स :khamgaonखामगाव