बुलडाणा शहरात गेल्या १५ ते २० दिवसापासून घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सागवन परिसरात एका घरातून अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे प्रकरण समोर आलले असतानाच हा प्रकार समोर आला. ही घटना २४ डिसेंबर रोजी जरी घडली असली तरी या प्रकरणात २५ डिसेंबर रोजी रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही एका पोलीस कर्मचाऱ्याच्या दुकाचीवरील पिशवीतून दोन लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. या तीन घटना पाहता जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, गुरुकृपानगरमध्ये राहणारे अजय सुभाष भोपळे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यामध्ये ४० हजारांची सोन्याची पोत, ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ, ४५ हजा रुपयांच्या अंगठ्या व अन्य दागिने असा माल लंपास केला आहे. भोपळे यांच्या घर फोडून अज्ञात चोरट्यांनी दागिने लंपास केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव हे पुढील तपास करत आहेत.