खामगाव (बुलडाणा) : स्थानिक तायडे कॉलनी भागातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी अलमारीतील सुमारे ८0 हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना काल मध्यरात्री दरम्यान घडली. स्थानिक तायडे कॉलनी भागातील रहिवासी नितीन गजानन फाळके (२८) हे काल पत्नीसोबत मूळगाव चिंचपूर येथे गेले होते. त्यामुळे घरात कोणी नसल्याची संधी साधून काल मध्यरात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला व घरातील अलमारीमधील सोन्याची पोथ १५ ग्रॅम,कर्णफुले व साखळी ४ ग्रॅम, अडीच ग्रॅमची अंगठी व १ ग्रॅम वजनाचा ओम असा ८0 हजाराचा ऐवज लंपास केला. सदर घटना आज नितीन फाळके हे घरी परतल्यावर उघडकीस आली. याबाबत माहिती पो.स्टे.ला दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुरेश हुडेकर, पोहेकाँ अरविंद राऊत, पोकाँ ज्ञानेश्वर वरणकार, पोकाँ नितीन मोरे आदींनी घटनास्थळ पंचनामा केला. याप्रकरणी नितीन फाळके यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी कलम ४५४, ४५७, ३८0 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव येथे घरफोडी
By admin | Published: November 13, 2014 11:53 PM