भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी निलंबित केले आहे. यापृष्ठभूमीवर आघाडी सरकारच्या निषेधार्थ ५ जुलै रोजी आ. श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आघाडी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविला. आंदोलनानंतर १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे, भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, अॅड. संजय सदार, नगरसेवक गोविंद देव्हडे, सुभाषअप्पा झगडे, राजेश अंभोरे, ज्ञानेश्वर सवडे, सिद्धेश्वर ठेंग, स्वीय सहाय्यक सुरेश इंगळे, योगेश राजपूत, अक्षय भालेराव, राजेश अंभोरे, हरिभाऊ परिहार, सागर पुरोहित, नरेंद्र मोरवाल, युवराज भुसारी, सचिन कोकाटे, महेश लोणकर, बद्री पानगोळे, संदीप लोखंडे, रमेश सोळंकी, उद्धवराव सोळंकी, संतोष ठाकरे, डिगांबर जाधव, उद्धवराव पवार, संतोष ठाकरे, गजानन दुधाळे, अविनाश भाकडे, गणेश यंगड, अरूण सोनवणे, राजीव शाह, कैलास घाडगे, संदीप बोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:43 AM