प्रतिसाद पाहून वाढविणार एसटीच्या फेऱ्या
प्रवाशांच्या प्रतिसादावर गाड्यांची संख्या अवलंबून असल्याने पहिल्या दिवशी मर्यादित स्वरूपात गाड्या सोडण्यात आल्या. जसा प्रतिसाद वाढेल, त्या प्रमाणात गाड्याच्या संख्येत वाढ होईल.
जिल्ह्यात रोज एसटीच्या फेऱ्या - १६०
रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या -२०००४
बसने मेहकर, शेगावला गर्दी
बसने शेगाव, मेहकर व मलकापूर मार्गावर गर्दी आहे. बुलडाणा आगारातून यापूर्वीही २० बसेस सोडण्यात येत होत्या. त्यामध्ये मलकापूर मार्गावरच प्रवासी अधिक होते. आता पूर्ण क्षमतेने बसेस सुरू झाल्या असून, एसटी महामंडळाला उत्पन्न वाढीची आशा आहे.
अत्यावश्यक कामासाठीच प्रवास
एसटी बस सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. परंतु कोरोना अद्याप संपला नाही, त्यामुळे अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणे आवश्यक आहे. प्रवाशांनीसुद्धा नियमांचे पालन करावे.
-वैभव पवार
एसटी बसेस आता पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. वेळोवेळी बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. प्रवाशांनीही मास्क लावून एसटीने सुरक्षित प्रवास करावा.
ए. यू. कच्छवे, विभाग नियंत्रक, बुलडाणा.