ठळक मुद्देएम एच 40 एन 8489 या क्रमांकाची बस अासलगावच्या पुढे सुपो जीनिंगजवळ उलटली. विद्यार्थ्यांसह दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले.
नांदुरा: नांदुरा ते जळगाव जामोद रोडवर आसलगाव नजीक बस उलटल्याची घटना शनिवारी सकाळी 9 वाजता घडली. रस्त्याच्या कडेला मुरुमाचा भरावा ऐवजी ठेकेदाराने चक्क आजूबाजूची काळी माती भरल्याची ओरड प्रवाशांची होती. मात्र याकडे अधिकारी यांनी सातत्याने दुर्लक्ष केल्याने २१ सप्टेंबरच्या सकाळी नऊ वाजेदरम्यान पळशी सुपो ते जळगाव जामोद ही जळगाव आगाराची एम एच 40 एन 8489 या क्रमांकाची बस अासलगावच्या पुढे सुपो जीनिंगजवळ उलटली. विद्यार्थ्यांसह दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)