- योगेश फरपटखामगाव: बुलडाणा लोकसभा मतदारात निवडणूक प्रचाराला वेग आलेला दिसून येतो. निवडणूकीच्या प्रचारासाठी उमेदवाराच्या पाठोपाठ कार्यकर्तेही फिरताना दिसत आहेत. शुक्रवारी, ४ एप्रिलरोजी खामगाव शहराचे तापमान ४३ डिग्री सेल्सीअस असल्याची नोंद आहे. पुढील आठवडाभरात सुद्धा तापमान कायम राहणार असल्याचा अंदाज वेध शाळेने व्यक्त केला आहे.विदर्भात नागपूरनंतर खामगावचे तापमान सर्वाधीक राहते. गत आठवड्यापासून शहरातील तापमानात कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते. खामगाव शहरासह बुलडाणा, नांदुरा, मलकापूर, देऊळगाव राजा, चिखली या शहरातील तापमानात सुद्धा कमालीची वाढ झाल्याची नोंद आहे. त्यामुळे निवडणूकीच्या प्रचारासाठी धामधुम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वत:ची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. अन्यथा उन्हाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांसोबतच नागरिकांनी सुद्धा सभांना जातांना दुपट्टा, पाणी, छत्री आदी साहित्य सोबत ठेवण्याचेही आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
काळजी न घेतल्यास उष्माघाताचा धोकानिवडणूकीच्या धामधुमीत स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उन्हात फिरतांना डोक्याला रुमाल, दुपट्टा बांधूनच फिरावे. शिवाय अनवाणी पायाने फिरू नये. शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु करण्यात आला आहे. ताप, अंगदुखी वाटल्यास तत्काळ डॉक्टरांकडे उपचार करून घ्यावा.- डॉ. नीलेश टापरे, निवासी वैद्यकीय अधिकारी , सामान्य रुग्णालय, खामगाव.हे कराल तर वाचाल?1. उन्हात बाहेर गरम हवा वाहत असते. त्यापासून शरीराचं रक्षण करण्यासाठी चेहरा सुती कपड्याने झाका.2. घराबाहेरुन उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी घेऊ नका. कारण त्याचा शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते.3. उन्हाळ्यात शक्यतो सुती कपड्यांचा वापर करा. त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.4. बाहेर जातांना गॉगल, टोपी आणि रुमाल वापरा.
एप्रिलच्या शेवटी तापमानात आणखी वाढ होईलतापमान वाढले की हवेचा दाब कमी होतो. त्यानंतर पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काही भागात बºयाच भागात पाऊस झाला. चार ते पाच दिवसांपूर्वी अंदाज व्यक्त केला होतो. विदर्भातील अकोला आणि खामगावला कमालीची वाढ होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र, हिंद महासागरातील पाण्याच्या पृष्टभागाचे तापमान प्रचंड वाढले आहे. एप्रिल-मे मध्ये ‘प्रि मान्सून’ची शक्यता आहे.- रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ, पुणे