बुलडाण्यात काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात होणार निवडणुकीचे मंथन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:02 AM2018-03-27T00:02:37+5:302018-03-27T00:02:37+5:30
बुलडाणा: आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी काँग्रेसने जिल्हानिहाय शिबिरांचे आयोजन केले आहे. बुलडाण्यात येत्या ६ एप्रिल रोजी प्रशिक्षण शिबिर होण्याची शक्यता असून, या शिबिरामध्ये निवडणुकीसंदर्भात मंथन होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी काँग्रेसने जिल्हानिहाय शिबिरांचे आयोजन केले आहे. बुलडाण्यात येत्या ६ एप्रिल रोजी प्रशिक्षण शिबिर होण्याची शक्यता असून, या शिबिरामध्ये निवडणुकीसंदर्भात मंथन होणार आहे.
विदर्भातील प्रशिक्षण शिबिरांची २३ मार्चपासून सुरुवात झाली आहे. अमरावती, यवतमाळ व अकोल्यानंतर आता बुलडाण्यात शिबिर होऊ घातले आहे. या शिबिरात काँग्रेसचे अ. भा. सरचिटणीस मोहनप्रकाश, माजी खा. मुकुल वासनिक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम, चारुलता टोकस, नाना पटोले, अनंतराव देशमुख, आमदार राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ व शिबिराच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे श्याम उमाळकर आदी नेत्यांच्या उपस्थित प्रशिक्षण शिबिर होत आहे. या प्रशिक्षण शिबिरात मतदारसंघनिहाय काँग्रेसची स्थिती व संभाव्य रणनीती यावरही चर्चा होणार असल्याने आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या पदाधिकार्यांना दिशा मिळणार आहे.
मराठवाडा, विदर्भातील शिबिरांची सूत्रे श्याम उमाळकर यांच्या हाती
बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष श्याम उमाळकर यांची शिबिरांच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. ठाणे, मराठवाडा विभागासह विदर्भातील शिबिरांपैकी सहा शिबिरांचे सूत्रसंचालन तसेच वक्त्यांचे विषय ठरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. प्रशिक्षण शिबिर हे शिबिरासारखेच झाले पाहिजे त्याचा मेळावा होऊ नये म्हणून प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण यांनी उमाळकर यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. शिबिरात मान्यवर नेत्यांचा प्रोटोकॉल कायम ठेवत शिबिरात येणार्या प्रत्येक पदाधिकार्याच्या शंकाचे निरसन होईल, अशी रचना शिबिराची करण्यात उमाळकर यांचा मोठा वाटा आहे.