लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला १५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे; मात्र सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेले उमेदवार विरोधकांच्या उमेदवारांवर लक्ष ठेवून असून, त्यानंतरच उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सध्या उमेदवार ‘वेट अँण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. जिल्ह्यात माहे नोव्हेंबर ते डिसेंबर २0१७ या कालावधीत मुदत संपणार्या २७९ ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करणे १५ ते २२ स प्टेंबरपर्यंत सकाळी ११ वाजतापासून दुपारी ४.३0 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली. १५ सप्टेंबरपासून तर १८ सप्टेंबर पर्यंत २७९ ग्रामपंचायतींपैकी सरपंच पदासाठी केवळ ६ तर सदस्यांसाठी ७ अर्ज आले. मोठय़ा ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी चुरस वाढली आहे. सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेण्याला सुरुवात केली असून, अनेक गावांमध्ये जेवणावळीही सुरू झाल्या आहेत. इच्छुक उमेदवारांकडून सध्या विरोधी गटाकडून कोण उमेदवारी दाखल करणार असून, त्यानुसार जातीय समीकरणे जुळविण्यात येत आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे. या यादरम्यान कोणतेही शुभ काम करण्यात येत नाही. त्यामुळे जिल्हय़ात ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज भरण्याकडे पाठ फिरविण्यात येत आहे. २१ सप्टेंबरपासून िपतृपक्ष संपणार आहे. त्यामुळे त्यानंतर अर्ज भरण्याला गती येणार आहे. मतदान ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३0 ते ५.३0 वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी ९ ऑक्टोबर २0१७ रोजी होणार आहे.
उमेदवारांचे ‘वेट अँण्ड वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:09 AM
बुलडाणा: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला १५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे; मात्र सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेले उमेदवार विरोधकांच्या उमेदवारांवर लक्ष ठेवून असून, त्यानंतरच उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सध्या उमेदवार ‘वेट अँण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत.
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक विरोधकांच्या उमेदवारांकडे लक्ष