लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : गावाजवळील कठडे नसलेल्या इंग्रजकालीन पुलावरून ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता कार खाली कोसळल्याची घटना घडली. यामध्ये कारचालक जखमी झाला. गावाजवळ इंग्रजकालीन पूल असून वाहनांसाठी हा पूल धोकादायक बनला आहे. कालबाह्य झालेला हा पूल धामणगाव बढे गावाजवळच असून, या पुलाची अवस्था अत्यंत वाईट आहे. सदर पुलावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. या पुलावर संरक्षण कठडे नसल्याबाबतचे वृत्त वर्तमानपत्रातून अनेक वेळा प्रकाशित झाले; मात्र संबंधित विभागाने या बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. धामणगाव बढे येथील शेतकरी राजू रंगीलदास साखरे (वय २८) आपल्या मोताळा रोडवरील शे ताकडे स्वत:च्या इंडिका गाडीतून जात असताना पुलावर पडलेल्या खड्डय़ांमुळे एम.एच.0९ ए.बी.७२२0 या इंडिका गाडीचे स्टेअरींग रॉड तुटल्यामुळे कार नदीपात्रात कोसळली. त्यामध्ये चालक राजू साखरेसुद्धा गाडीतच अडकलेल्या अवस् थेत पुलाखाली गाडीमध्ये अडकून पडले. पुलाखाली थोडे पाणी असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. कार खाली कोसळताच आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरड केली. त्यामुळे असंख्य लोक घटनास्थळी धावत आले. त्यांनी पुलाखाली उतरून पाण्यामध्ये जावून राजू साखरे यांना गाडीतून बाहेर काढले व त्वरित रुग्णालयात दाखल केले. यामध्ये राजू साखरे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पुलावर कठडे लावण्याची मागणी गावकर्यांच्यावतीने अनेकदा करण्यात आली आहे; मात्र, गावकर्यांच्या मागणीची शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. मागील वर्षी या पुलाच्या पूर्व-पश्चिम बाजूला संरक्षण कठडे लावण्यात आले होते; मात्र पुलावर कोणत्याही प्रकारचे संरक्षण कठडे लावण्यात आले नाही.
कठडे नसलेल्या पुलावरून कार कोसळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 1:18 AM
धामणगाव बढे : गावाजवळील कठडे नसलेल्या इंग्रजकालीन पुलावरून ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता कार खाली कोसळल्याची घटना घडली. यामध्ये कारचालक जखमी झाला.
ठळक मुद्देचालक जखमी परिसरातील नागरिकांनी वाचविले प्राण