सध्या चिखली तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. दमा, बिपी, शुगर, या जोखमीच्या आजाराच्या नागरिकांची सवणा आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत यांच्या वतीने विशेष शिबिर २५ फेब्रुवारी रोजी घेऊन ६० नागरिकांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीकरिता डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. सपना राठाेड, तसेच आरोग्य सहाय्यक व्ही. एस. जाधव, डी. एस. सिरसाठ, पी. एस. जवंजाळ, एस. एम. डोंगे यांनी मेहनत घेतली तसेच परिचारक पुष्पा गवई याची मदत झाली. सवणा गावात गत काही दिवसापासून कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे.त्यामुळे प्रशासनाने कोरोनाविषयक नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.