लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव(बुलडाणा) : जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या हितासाठी ७ मार्च २०१८ रोजी शिक्षक सेनेच्यावतीने शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात जिल्हा सरचिटणीस महेंद्र रोठे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्टेट बँक शाखाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये पंचायत समितीद्वारा जमा होणारे वेतन तत्काळ, विनाविलंब शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. शिक्षकांचे वेतन विलंबाने खात्यात जमा केले तर शिक्षक सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनामार्फत देण्यात आला. भारतीय स्टेट बँकेमध्ये वेतनाकरिता सुरू असलेल्या शिक्षकांच्या खात्यांना कॉपरेट सॅलरी पॅकेजचा दर्जा देण्यात यावा. बँकेत जमा रक्कम ई-मोडद्वारे खात्यात जमा होऊन झालेल्या रकमेवर बँकेद्वारा व्याजाची आकारणी जास्त प्रमाणात मिळते. तसेच डिमॅट अकाउंट सेवा उपलब्ध होईल. (शेअर बाजार गुंतवणूक करण्यासाठी) डिमांड ड्राफ्ट काढणे, चेक बुक, सर्व आॅनलाइन व्यवहारावर कोणतीही आकारणी होत नाही, एस.एम.एस. सुविधेच्या नावाखाली बँक कोणतेही चार्ज लावू शकत नाही, सध्या बँकेद्वारा १०० ते २०० रुपये वार्षिक रक्कम परस्पर बँक कपात करत आहे. या सर्व सेवा सुविधांचा लाभ मिळावा, अशी मागणी शिक्षक सेनेच्यावतीने करण्यात आली. सदर मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन झेडण्याचा इशाराही निवेदनामार्फत देण्यात आला आहे. या प्रसंगी तालुका अध्यक्ष सुनील घावट, जिल्हा प्रतिनिधी नरहरी टिकार, उपाध्यक्ष हरिदास फाळके, संजय शेगोकार, यू.एस.मेटांगे, कार्यकारिणी सदस्य सचिन वडाळ, देवमन डोसे, आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक यांना निवेदन देण्यात आले आहे.
वेतनास विलंब झाल्यास शिक्षक सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 1:03 AM
शेगाव(बुलडाणा) : जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या हितासाठी ७ मार्च २०१८ रोजी शिक्षक सेनेच्यावतीने शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात जिल्हा सरचिटणीस महेंद्र रोठे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्टेट बँक शाखाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देसर्व सेवा सुविधांचा लाभ मिळावा, अशी मागणी