ठळक मुद्देजलाशयालगत बुडीत क्षेत्रात विहीर, बोअर घेऊ नये, अशा सूचना पाटबंधारे विभागाने दिला कडक कारवाई करण्याचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात असमाधानकारक पाऊस झाल्यामुळे बुलडाणा पाटबंधारे विभागांतर्गत येत असलेल्या प्रकल्पात पाणीसाठा कमी आहे. तसेच काही प्रकल्पात, तर पाणीसाठा निरंक आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी उपलब्ध पाणीसाठय़ाचा अवैध वापर करणे, जलाशयालगत बुडीत क्षेत्रात विहीर, बोअर घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.जर कुणी पाणीसाठय़ाचा अवैध वापर व उपरोक्त ठिकाणी विहीर घेतल्यास फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. तसेच कडक कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. याबाबत पाणी आरक्षण समिती बैठकीत पालकमंत्री पांडुरंग फुंडकर व जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी २७ ऑक्टोबर रोजी दिल्या होत्या.